वैदेही परशुरामीचा हिरव्या साडीत घायाळ करणारा अंदाज, सौंदर्य पाहून चाहते करत आहेत कौतुक

मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामीचा हिरव्या साडीमध्ये सुंदर लूक. सौंदर्याने वेधलं सर्वांचं लक्ष. फोटो पाहून चाहते करत आहेत कमेंट्सचा वर्षाव.

| Updated on: Sep 28, 2026 | 4:01 PM
1 / 5
लोकप्रिय अभिनेत्री वैदेही परशुरामी आपल्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि स्टायलिश अंदाजासाठीही ओळखली जाते. विविध फोटोशूटमधून ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

लोकप्रिय अभिनेत्री वैदेही परशुरामी आपल्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि स्टायलिश अंदाजासाठीही ओळखली जाते. विविध फोटोशूटमधून ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

2 / 5

सोशल मीडियावर सक्रिय असणारी वैदेही तिच्या नवनवीन लूकचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकतेच वैदेहीने तिचे हिरव्या रंगाच्या साडीतील काही खास फोटो शेअर केले आहेत.

3 / 5

या फोटोंमध्ये तिचा पारंपरिक आणि आकर्षक अंदाज पाहायला मिळत आहे. गडद हिरव्या रंगाच्या साडीमध्ये वैदेही कमालीची सुंदर दिसत असून, तिच्या या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

4 / 5

या साडीला असलेला सोनेरी-राखाडी रंगाचा नाजूक काठ तिच्या लूकला अधिक खुलवत आहे. त्यासोबत वैदेहीने घातलेल्या नाजूक दागिन्यांमुळे तिचा पारंपरिक लूक आणखी उठून दिसत आहे.

5 / 5

साधेपणा आणि एलिगन्सचा सुंदर मेळ तिच्या या फोटोशूटमध्ये पाहायला मिळतो. हे सुंदर फोटो शेअर करताना वैदेहीने ‘Dreaming in green!’ असे खास कॅप्शन दिले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us