
कोरोनामुळे अनेकांच्या लग्नाला ब्रेक लागला आहे. मात्र आता सिनेजगतातले सिंगल्सही मिंगल व्हायला लागले आहेत. अशातच नेहा कक्कड आणि पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंग लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. या दोघांच्या नात्याबद्दल महत्वाची गोष्ट म्हणजे नेहा रोहनप्रीतहून 7 वर्षाने मोठी आहे. मात्र, वयाचा एवढा मोठा गॅप असलेलं हे बॉलिवूडमधील पहिलच जोडपं नाहीये. याआधीही अनेक अभिनेत्रींनी आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्यांशी लग्न केलं आहे.

बिपाशा बसु - करणसिंह ग्रोवर : बिपाशा आणि करणमध्ये 3 वर्षांचा गॅप आहे. बिपाशा करणपेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. या दोघांचं लग्न 2016 मध्ये झालं होतं. करणचं हे दुसरं लग्न आहे.

सैफ अली खान- अमृता सिंह : अभिनेत्री अमृता सिंह आणि अभिनेता सैफ अली खान यांच्यात 12 वर्षांचा गॅप आहे. सैफ अमृताहुन 12 वर्षाने लहान आहे. या दोघांचं लग्न 1991मध्ये झालं मात्र ते जास्त काळ टिकू शकलं नाही. 2004मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.


प्रियंका चोपडा- निक जोनस : काही दिवसांपूर्वी प्रियंका आणि निक जोनस यांची जोडी चर्चेत होती. ती निकहून 10 वर्षांनी मोठी आहे. 2018 च्या डिसेंबरमध्ये या दोघांनी भारतातच लग्न केलं होतं.

अर्चना पूरन सिंह- परमीत सेठी : अर्चना आणि परमीत सेठी यांच्यात 7 वर्षांचा गॅप आहे. अर्चना ही परमीत पेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे. या दोघांचं लग्न 1992 मध्ये झालं होतं.

कुणाल खेमू - सोहा अली खान : कुणाल खेमू हा सोहा अली खानहून पाच वर्षाने लहान आहे. लग्नापूर्वी हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये होते, त्यानंतर दोघांनी 2015मध्ये लग्नगाठ बांधली.