
दिशा सालियान केसमध्ये स्वच्छ चारित्र्याचे नेतृत्व करणारे अदित्य ठाकरेंवर राजकिय आरोपांचे शिंतोडे ऊडवणाऱ्यांना ऊच्च न्यायालयाची चपराक असा आशय बॅनरवर असल्याचं दिसत आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही, असा दावा मुंबई पोलिसांनी दोन आठवड्यांपुर्वी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून केला...

दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप नारायण राणेंसह नितेश राणेंनी केला होता. याप्रकरणात आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करावी अशीही मागणी करण्यात येत होती.

मात्र आता पोलिसांनी केलेल्या प्रतिज्ञापत्रानंतर कार्यकर्त्यांकडून वांद्रे येथील मातोश्री परिसरात बॅनरबाजी पाहायला मिळत आहे...

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर असलेली दिशा सालियान हिने 8 जून 2020 रोजी मालाड येथील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून कथितरित्या आयुष्य संपवलं.