पाकिस्तानी न्यूज अँकर्सची अदनान सामीने ‘थ्री इडियट्स’च्या डायलॉगने उडवली खिल्ली

'ऑपरेशन सिंदूर'नंतर गायक अदनान सामीने सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केले आहेत. या पोस्टद्वारे त्याने पाकिस्तानी टीव्ही न्यूज अँकर्सची खिल्ली उडवली आहे. अदनानचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे.

| Updated on: May 07, 2025 | 3:29 PM
1 / 5
प्रसिद्ध गायक अदनान सामीने भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया दिली आहे. 'ऑपरेशन सिंदूर'चं त्याने समर्थन केलं असून पाकिस्तानी न्यूज अँकर्सला चांगलाच टोला लगावला आहे.

2 / 5
'ऑपरेशन सिंदूर'ची पोस्ट शेअर करत अदनानने 'जय हिंद' असं लिहिलंय आणि त्याचसोबत भारताच्या झेंड्याचा इमोजी पोस्ट केला आहे. पहलगाममधील हल्ल्याच्या 14 दिवसांनंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ  दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले.

3 / 5
अदनानने पाकिस्तानी न्यूज अँकर्ससाठी उपरोधिक पोस्ट लिहिली आहे. पाकिस्तानी न्यूज अँकर्सच्या डोक्यावर बंदूक रोखल्याचा एआय फोटो शेअर करत अदनानने लिहिलं, 'पाकिस्तानी टीव्ही न्यूज अँकर्स आता म्हणत असतील.. आल इज वेल!'

4 / 5
'आल इज वेल' (all is well) हा 'थ्री इडियट्स'मधील आमिर खानचा प्रसिद्ध डायलॉग आहे. चित्रपटात जेव्हा कधी तो टेन्शनमध्ये असायचा तेव्हा स्वत:चं मन शांत करण्यासाठी हा डायलॉग म्हणायचा. सर्वकाही ठीक आहे.. हे जणू तो स्वत:लाच समजावण्याचा प्रयत्न करायचा.

5 / 5
पहलगाममधील दहशवादी हल्ल्यानंतर अदनान सामीने अनेकदा सोशल मीडियावरील पोस्टद्वारे पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. अदनानला काही वर्षांपूर्वी भारताचं नागरिकत्व मिळालं आहे.