Sleep Quality : झोपच लागत नाहीये, डाराडूर झोपायचंय?; मग ‘या’ सवयी फॉलो करा

| Updated on: Feb 08, 2023 | 3:36 PM

खराब जीवनशैलीमुळे आपल्या झोपेच्या गुणवत्तेवरही खूप वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत चांगल्या, आरोग्यदायी सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.

1 / 5
आजकाल खराब जीवनशैलीमुळे अनेक लोकं हे निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त असतात. पण ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. 8 ते 9 तासांची झोप आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पण शांत झोप हवी असेल तर काह वाईट सवयी सोडाव्या लागतील व काही चांगल्या सवयी अंगी बाणवाव्या लागती

2 / 5
बरेच लोक दिवसभर उत्साही राहण्यासाठी कॉफी पितात. पण तुम्हाला माहित आहे का की जास्त कॉफी प्यायल्याने तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होतो. एक कप कॉफी प्यायल्यानंतर पाच ते सात तासांनंतरही अर्धे कॅफिन तुमच्या सिस्टीममध्ये असते. म्हणून, जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल, तर दिवसातील शेवटची कॉफी दुपारी 2 च्या सुमारास घ्या.

3 / 5
झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करा. आंघोळ केल्याने तुम्हाला चांगली झोप येऊ शकते. आंघोळीनंतर तुमच्या शरीराचे तापमान हळूहळू कमी होऊ लागते. यामुळे शांत व गाढ झोप येण्यास मदत होते.

4 / 5
आपल्यापैकी बरेच जण रात्री उशिरापर्यंत मोबाईल स्क्रोल करत राहतात. याचा आपल्या डोळ्यांवर वाईट परिणाम तर होतोच पण झोपेची गुणवत्ताही बिघडते. म्हणूनच झोपण्यापूर्वी काही वेळ आधी मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही पाहणे बंद करा.

5 / 5
 विश्रांतीची गरज नाही केवळ तुमच्या डोळ्यांनाच नव्हे तर तुमच्या पचनसंस्थेलाही असते. रात्री उशिरा जेवल्याने तुमची पचनसंस्था नीट काम करत नाही. याचा तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी जेवावे.