मौनी रॉयनंतर आता आणखी एका सेलिब्रिटीच्या घटस्फोटाची चर्चा; म्हणाली “सोबत राहू शकत नाही..”

अभिनेत्री मौनी रॉयनंतर आता एका प्रसिद्ध कॉमेडियनच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होत आहे. या चर्चांवर खुद्द तिनेच प्रतिक्रिया दिली आहे. युट्यूबवर व्लॉग पोस्ट करत तिने घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

| Updated on: May 19, 2026 | 12:45 PM
1 / 5
अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांच्या घटस्फोटाच्या चर्चा असतानाच आता आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याच्या विभक्त होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. ही सेलिब्रिटी जोडी दुसरी-तिसरी कोणती नसून कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया आहे. हर्ष आणि भारती यांनी 2017 मध्ये गोव्यात लग्न केलं होतं. आता लग्नाच्या 9 वर्षांनंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सतत खटके उडत असल्याची चर्चा आहे.

2 / 5
भारती आणि हर्ष यांच्यात सतत भांडणं होत असून हे दोघं घटस्फोट घेण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं गेलं. भारती आणि हर्ष यांना दोन मुलं आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांतच भारतीने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. आता खुद्द भारती तिच्या घटस्फोटाच्या चर्चांवर व्यक्त झाली आहे. तिने तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्लॉग पोस्ट केला आहे.

3 / 5
या व्लॉगमध्ये भारती म्हणते, "मी आता हर्षसोबत राहू शकत नाही. कारण आमच्यात आता फूट पडू लागली आहे. माझी सतत चिडचिड होतेय. बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या हर्षलाही सहन होत नाही आहेत. आमच्यात खटके उडत असून आम्ही विभक्त होत आहोत."

4 / 5
त्यानंतर लगेचच भारती रागात म्हणते, "अशा बऱ्याच फालतू बातम्या समोर येत आहेत. या सर्व बातम्या चुकीच्या आहेत. मी आणि हर्ष कधीच वेगळे होऊ शकत नाही. कदाचित मेल्यानंतरही आम्ही वेगळे होणार नाही. मी आणि हर्ष नेहमीच सोबत होतो आणि यापुढेही राहू. त्यामुळे आमच्या घटस्फोटाच्या चर्चा थांबवा."

5 / 5
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाने 2017 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर 2022 मध्ये भारतीने लक्ष्य या मुलाला जन्म दिला. डिसेंबर 2025 मध्ये भारती दुसऱ्यांदा आई बनली. तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला असून त्याचं नाव यशवीर असं आहे. भारतीने स्वत: व्लॉग पोस्ट करत तिच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Follow Us