
VSR या कंपनीचं हे विमान आहे. शेतात विमान कोसळल्यानंतर स्थानिकांना मोठा आवाज आला. त्यानंतर विमानाला भीषण आग लागली. त्यानंतर देखील चार ते पाच स्फोट झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. आग मोठी असल्यामुळे ती विझवणं शक्य नव्हतं.

विमान अपघात झाल्याचं लक्षात आल्यानंतर स्थानिक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह काढण्यास सुरुवात केली. अपघातात अजित पवार यांच्यासह विमानात उपस्थित असलेल्यांचं देखील निधन झालं आहे. अपघाता नंतर राज्यात शोककळा पसरली आहे.

अजित पवार यांचा मृतदेह त्यांच्या हातात असलेला घड्याळ, त्यांनी घातलेला गॅगल आणि जॅकेटमुळे ओळखण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यानंतर सर्व मृतदेह झाकण्यासाठी स्थानिकांनी ब्लँकेट आणि घरात असलेल्या कपडे पोलीस आणि मदतकार्य करणाऱ्यांना दिले. त्यानंतर सर्व मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना विमान शेतात कोसळलं आणि त्याला भीषण आग लागली. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) धक्कादायक माहिती दिली आहे.

एका नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाल्यानंतर आम्ही काय झालं पाहायला आलो, तेव्हा विमान अपघात झाल्याचं कळलं. विमानाला आग लागली होती आणि त्यानंतर चार - पाच स्फोट झाले. त्यानंतर लोकांची गर्दी जमली... यामध्ये अजित दादा यांचं निधन झालं आहे.