
कोरोना प्रतिबंधक लसीशी निगडीत अनेक वेगवेगळ्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील मात्र आता नाशिकमध्ये एक अजब प्रकार समोर आलाय.

72 वर्षीय रवींद्र सोनार यांनी 8 दिवसांपूर्वी कोरोनाच्या कोविशील्ड लसीचा डोस घेतला होता. त्यानंतर त्या आता अजब दावा केला आहे.

त्यांच्या म्हणण्यांनुसार त्यांच्या अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू तसेच कॉईन चिटकत आहेत.

आता या दाव्यामुळे सोनार कुटुंब हे चांगलेच चर्चेत आलंय. या घटनेचा मात्र त्यांना काहीही त्रास होत नाहीये. असं त्यांचं मत आहे.

त्यांच्या मुलानं युट्यूबवर असा एक व्हिडीओ पाहिला आणि नंतर वडिलांच्या अंगाला स्टील, लोखंड आणि नाने चिटकवून पाहिलं आणि आश्चर्याची बाब म्हणजे हे अगदी सहजपणे त्यांच्या अंगाला चिटकलं.

मात्र ही घटना अंधश्रद्धाशी संबंधित नाहीये. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत त्यामुळे घाबरून न जाता यावर तज्ज्ञाची काय प्रतिक्रिया आहे हे समजून घेणं गरजेचं आहे असं मत अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाशिकचे कृष्णा चांदगुडे यांनी व्यक्त केलं आहे.