सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर मोठा निर्णय, होऊ शकतात मोठे बदल

अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेत्याची प्रकृती आता स्थिर आहे. अभिनेत्याला आज रुग्णालयातून सुट्टी मिळणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. अशात सैफ आणि खान कुटुंब राहत असलेल्या सोसायटीमध्ये अनेक बदल करण्यात येत आहेत.

| Updated on: Jan 21, 2025 | 2:14 PM
1 / 5
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याच्या सोसायटीच्या बाल्कनीत सध्या जाळी बसवण्याचे काम सुरू आहे. हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

2 / 5
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर सोसायटीच्या सुरक्षेवर आणि खुल्या बाल्कनीवर प्रश्न उपस्थित केले जात होते? याच कारणामुळे आता बाल्कनीत जाळी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

3 / 5
हल्ल्यानंतर सोसायटीच्या बाल्कनीत कुणी आत जाऊ नये यासाठी जाळी बसवण्याचे काम सुरू आहे. सुरक्षा लक्षात घेऊन या जाळ्या बसविण्यात येत आहेत.

4 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या सोसायटीचे सुरक्षा रक्षक देखील बदलले जाऊ शकतात, ज्या एजन्सीकडे सुरक्षा रक्षकांचा करार होता तो रद्द करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.

5 / 5
सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी ठाणे येथून अटक केली. चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसखोरी केली... असं खुद्द आरोपीने पोलीस चौकशीत कबुल केलं आहे.