
'अग्गबाई सासूबाई' मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखांसोबतच वाहवा मिळवली ती आजोबांच्या व्यक्तिरेखेने. आजही "सोम्या कोंबडीच्या, अरे चप्पलचोर" हे संवाद ऐकले की आजोबांची आठवण येते.

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या दमदार अभिनयानं ही भूमिका जिवंत केली होती. काही दिवसांपूर्वी रवी पटवर्धन यांचं निधन झालं.

ते साकारत असलेली भूमिका आता कोण करणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा होती.

ती व्यक्तिरेखा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी साकारतील. 4 जानेवारी 2021 पासून त्यांची मालिकेत एन्ट्री होणार आहे.

आता आजोबांची भूमिका मोहन जोशी साकारणार म्हटल्यावर प्रेक्षकांना आनंद झालाय.

आता आजोबा मालिकेत परत येणार म्हटल्यावर मालिका अजूनच मजेदार होणार हे नक्की.