
मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला इतकं यश मिळेल, याची कल्पना कोणीच केली नव्हती. नवोदित कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'सैयारा'ने अनेक विक्रम मोडले आहेत.

18 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आता तीन आठवड्यांहून अधिक काळ झाला आहे. आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजविषयीची महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. ही अपडेट या चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरनेच शेअर केली आहे.

यशराज फिल्म्सचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी 'सैयारा'च्या ओटीटी रिलीजविषयीची तारीख आणि प्लॅटफॉर्म यांबद्दलची माहिती दिली आहे.

शानू शर्माने शेअर केलेल्या पोस्टनुसार 'सैयारा' हा चित्रपट बरोबर एक महिन्याने म्हणजेच 12 सप्टेंबर 2025 रोजी ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

'सैयारा'ने गेल्या 24 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 318.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने बजेटच्या पाच पट जास्त कमाई केली आहे. अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडेनं या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.