Airtel : 41 कोटी ग्राहकांसाठी गुड न्यूज, 200 रुपयांच्या नव्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G अन् बरंच काही
Airtel 200 Plan : एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असून, ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनी वेळोवेळी नवे आणि आकर्षक रिचार्ज प्लॅन्स सादर करत असते. आता एअरटेलने 200 रुपयांना नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे.

सध्या एअरटेलकडे देशभरात सुमारे 41 कोटी ग्राहक आहेत. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी विविध प्रकारचे स्वस्त आणि फायदेशीर रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करून देते.

जर तुम्ही एअरटेलचे सिम वापरत असाल, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. एअरटेलने कमी किमतीत भरपूर फायदे देणारा एक नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हा नवीन प्रीपेड प्लॅन विशेषतः OTT कंटेंट पाहणाऱ्या आणि अधिक डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

एअरटेलने 200 रुपयांचा हा नवीन प्लॅन सादर केला असून, तो विद्यमान रिचार्ज प्लॅनसोबत अतिरिक्त डेटा आणि प्रीमियम कंटेंटचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी उपयुक्त आहे. या प्लॅनची 28 दिवसांची वैधता आहे.

या 200 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी 30GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. याशिवाय अनलिमिटेड 5G डेटाचाही लाभ मिळतो. मात्र, हा 5G डेटा केवळ 5G स्मार्टफोन आणि 5G नेटवर्क उपलब्ध असलेल्या ग्राहकांनाच मिळणार आहे.

हा प्लॅन वापरण्यासाठी तुमच्याकडे आधीपासून एअरटेलचा सक्रिय बेस रिचार्ज प्लॅन असणे आवश्यक आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी Jio Hotstar Mobile चे सबस्क्रिप्शन दिले जाते. याशिवाय या प्लॅनमध्ये Airtel Xstream Play Premium चा देखील लाभ मिळतो. या प्लॅटफॉर्मद्वारे Lionsgate Play, Sony LIV, Aha Premium, Chaupal, SunNXT यांसह 18 हून अधिक OTT अॅप्सवरील कंटेंट पाहता येतो.