
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा जोरदार सुरू आहे. ग्रे घटस्फोट ऐश्वर्या आणि अभिषेक घेणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न झाले. विशेष म्हणजे यांचे हे लग्न अत्यंत शाही पद्धतीने झाले.

विशेष म्हणजे लग्नात ऐश्वर्या राय हिने साडेतीन कोटींचे दागिने घातल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला 7 ते 8 कोटींचा खर्च करण्यात आला होता.

75 लाखांची साडी ऐश्वर्या राय हिने लग्नात घातली होती. कांजीवरम ही साडी होती. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची सतत चर्चा असल्याने त्यांचे चाहतेही हैराण झाले आहेत. मात्र, यावर बच्चन कुटुंबियापैकी कोणीही भाष्य केले नाहीये.