Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणेवर काय वेळ आली? टीम इंडिया सोडा, आता तर….

| Updated on: Feb 28, 2024 | 8:43 AM

Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणे एकवेळ टीम इंडियाचा भक्कम आधारस्तंभ होता. पण खराब फॉर्ममुळे तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. पुनरागमन करण्याचे तो जोरदार प्रयत्न करतोय. पण वास्तवातली परिस्थिती खूप वेगळी आहे.

1 / 10
एकवेळ होती, अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा आधारस्तंभ होता. टीम इंडियाकडून खेळताना तो मधल्याफळीत फलंदाजी करायचा. टिकून फलंदाजी करण्याची त्याची क्षमता होती. त्या बळावर त्याने भारताला अनेक सामने जिंकवून दिले.

2 / 10
अनेकदा त्याने टीमला पराभवातून वाचवलं. त्यामुळे कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा त्याच्याकडे सोपवली जायची. 2020-21 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. त्यावेळी कोहली पहिली टेस्ट मॅच खेळून मायदेशी परतला होता. त्यावेळी नेतृत्वाची जबाबदारी अजिंक्य रहाणेवर आली होती.

3 / 10
त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरीज जिंकली. पण आता तोच अजिंक्य रहाणे टीमच्या बाहेर आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर मागच्यावर्षी अजिंक्य टीम इंडियाचा भाग होता. त्यानंतर टीममधून त्याला बाहेर करण्यात आलं. आता तर अजिंक्यच टीम इंडियामध्ये कमबॅक अशक्य वाटतय.

4 / 10
टीम इंडियासोडा अजिंक्य रहाणेचा सध्याचा फॉर्म बघता त्याला मुंबईच्या टीममध्ये स्थान मिळेल, याची सुद्धा खात्री नाहीय. त्याला मुंबईच्या टीममधून सुद्धा बाहेर केलं जाऊ शकतं.

5 / 10
सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत अजिंक्य रहाणे मुंबईच नेतृत्व करतोय. पण त्याची बॅट शांतच आहे. त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीयत. त्यामुळे मुंबईच्या टीममध्ये त्याच स्थान टिकून रहाण्याची शक्यता कमी आहे.

6 / 10
परिस्थिती अशी आहे की, मुंबईचा 10 व्या नंबरचा फलंदाज जबरदस्त इनिंग खेळला. त्याने रहाणेने संपूर्ण सीजनमध्ये जितक्या धावा केल्या, त्यापेक्षा जास्त धावा एका इनिंगमध्ये केल्या.

7 / 10
रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये मुंबईचा 10 व्या नंबरचा फलंदाज तुषार देशपांडेने बडोदा विरुद्ध 123 धावा केल्या. इतक्या धावा, तर रहाणेने संपूर्ण सीजनमध्ये केलेल्या नाहीत.

8 / 10
राहणेने चालू सीजनमध्ये 10 इनिंगमध्ये  0, 0, 16, 8, 9, 1, 56*, 22, 3 & 0 धावा केल्या आहेत. तृषार एका सामन्यात रहाणेच्या पुढे निघून गेला. रहाणेने संपूर्ण सीजनमध्ये मिळून 115 धावा केल्या आहेत.

9 / 10
मुंबई टीमचा कॅप्टन असल्यामुळे कदाचित अजिंक्य रहाणे टीममध्ये आपल स्थान टिकवून आहे. हा फॉर्म पाहता अजिंक्य रहाणेसाठी टीम इंडियात कमबॅक कठीण आहे. तो मुंबईच्या टीमबाहेर गेल्यासही आश्चर्य वाटणार नाही.

10 / 10
अजिंक्य रहाणे यावर्षी जानेवारी महिन्यात म्हणाला होता की, "टीम इंडियासाठी 100 टेस्ट मॅच खेळण्याच स्वप्न आहे. पण सध्याचा त्याचा फॉर्म पाहता असं वाटत नाही की, त्याचं हे स्वप्न पूर्ण होईल"