
स्फोट होऊन विमानाने पेट घेतला. क्षणात ते आगीच्या ज्वाळांनी वेढलं गेलं आणि आणखी3-4 स्फोट झाले. बुधवारी सकाळी 8.45च्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक विदीप जाधव, विमानाचे पायलट कॅप्टन सुमित कपूर, को-पायलवट शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माली या पाचही जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या अख्ख्या बारामतीवर आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली असू पवार कुटुंबियांवर तर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.( All Photos : Social Media)

बुधवारी 28 जानेवारी रोजी बारामतीच्या धावपट्टीजवळ झालेल्या अपघातात, त्यांचं विमान कोसळलं आणि आग लागून मोठा स्फोट झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह एकूण 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाा. अजित दादांच्या जाण्याने फक्त एक राजकारणी गेला नाही तर एक सुसंस्कृत, अभ्यासू नेता, एक चांगलं, दिलखुलास व्यक्तिमत्व, दिलदार माणूस गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

अजित दादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरून निघणार नाही. त्यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबावरच नव्हे तर बारामतीकर आणि अख्ख्या महाराष्ट्रावर आघात झालाय, त्यांचं अपरिमित नुकसान झालंय. आज, (गुरूवार 29 जानेवारी) बारामतीतच अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

अजित पवार फक्त नेते नव्हते, एक चांगला माणूस, कुटुंबवत्सल व्यक्ती, भाऊ, काका, पुतण्याही होते. कुटुंबवत्सल दादा ते धुरंधर नेता… असा अजितदादांचा जीवनप्रवास काही फोटोंतून जाणून घेऊया.

चेस खेळणारे , तरूणपणातले अजित दादा.. राजकारणी म्हणून त्यांचा प्रवास अनेकांनी पाहिला आहेच. पण बाहेरच्या लोकांना सहज न दिसलेलं, त्यांच एक वेगळ रूपही या फोटोंमधून उलगडतं.

शरद पवार हे राष्ट्रवादीचे प्रमुख, सर्वेसर्वा म्हणून देशाला माहीत. पण अजित पवारांसाठी ते फक्त पक्षाचे प्रमुख नव्हते तर ते त्यांचे काका, त्यांचे रोल मॉडेल, दरक्षणी ज्यांच्याकडून शिकता येईल असे व्यक्तिमत्व होतं. शरद पवारांकडून राजकारणाचे धडे घेतलेल्या अजित पवार यांनी त्यांच्या छायेखाली राहूनही, एक उत्तम राजकारणी म्हणून आपली स्वत:ची एक वेगळी ओळख घडवली होती.

सुप्रिया सुळे आणि अजित पवार... या दोघांबद्दल वेगळं काही सांगायला नकोच. भाऊ-बहीणीचं नातं कसं असावं ते त्यांच्याकडे पाहून समजतं. सार्वजनिक ठिकाणी वावरताना, तिथला प्रोटोकॉल सांभालतानाही दोघांमधला जिव्हाळा हमखास दिसायचा. आपल्या दादाच्या जाण्याने शोकाकुल झालेल्या, अश्रूपूर्ण नयनांनी लाडका आहे म्हणत रडणाऱ्या सुप्रिया सुळे यांची कालची अवस्था पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं.

अभिनेते अशोक सराफ आणि अजित पवार यांच्यातला हा एक खास क्षण

दिवंगत नेते विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्यासह अजित पवार.. एका सोहळ्यादरम्यान टिपलेलं हे छायाचित्र

कुटुंबवत्सल अजित पवार.. राजकारणाच्या धकाधकीतही त्यांचं कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं नाही. मुलांना घडवताना ते तितकेच सजग होते. मुलासह टिपलेला हा एक क्षण

भारताच्या गानकोकिळा म्हटल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांच्यासह अजित पवार.. एका सोहळ्यातील हे दिलखुलास हास्य, शरद पवारही यावेळी उपस्थित होते.

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून ते कुटुंबियांसोबतही वेळ घालवायचे. पवार कुटुंब प्रत्येक चांगल्या, वाईट प्रसंगी, प्रत्येक सणाला एकत्र येतंच.

एका लग्नसमारंभादरम्यान अजित पवार यांची टिपलेली ही सुहास्य मुद्रा. फेटा घालून, हातात तलवार घेऊन असलेल्या दादांची ही मुद्रा फार क्वचितच लोकांना दिसली असेल.