Ajit Pawar Funeral | अजित पवार यांना अखेरचा निरोप, विद्या प्रतिष्ठानमधून अंत्ययात्रेला सुरुवात
अजित पवार यांचे पार्थिव बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यदर्शनासाठी नेण्यात येत असून, त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. अंत्ययात्रेदरम्यान नातेवाईक, महाराष्ट्रातील सर्व नेते मंडळी, राजकारणी, कार्यकर्ते, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजितदादांची अचानक एक्झिट प्रत्येक काळीज हेलावून गेली आहे. आज अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर अजितदादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नेण्यात येणार आहे. रुग्णालयापासून अजितदादांची अंत्ययात्रा सुरू झाली आहे. या अंत्ययात्रेत सर्वच क्षेत्रातील मान्यवर तसेच राज्यातील हजारो लोक सहभागी झाले आहेत. विद्या प्रतिष्ठान परिसरात शोकाकुल वातावरण असून नागरिकांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. दादांच्या जाण्याने कुटुंबीयांसह परिचित आणि समर्थकांमध्ये शोकाची लाट पसरली आहे. थोड्याच वेळात दादांच्या पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार पार पडणार असून दादांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे.
अजित पवारांवर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला
सुनेत्रा पवारांनी जड अंतकरणाने घेतली अजित पवारांची शेवटची भेट
'एकच वादा अजितदादा', 'अजितदादा अमर रहे', कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

