‘मी बायसेक्शुअल’ म्हणणाऱ्या आकांक्षा चमोला-पामेलाचा बेडवरील व्हिडिओ व्हायरल; ‘लेस्बियन अँगल’च्या चर्चांना उधाण

टीव्ही अभिनेत्री आकांक्षा चमोलाने 'लॉक अप 2' मध्ये मोठं गुपित उघड केलं. बायसेक्शुअल असल्याचं तिने मान्य केलं. यानंतर आता तिचा पामेलासोबतचा एक व्हिडीओ समोर आला असून नेटकऱ्यांनी तिला सुनावलं आहे.

| Updated on: Jul 08, 2026 | 3:07 PM
1 / 6
टीव्हीचा सुपरस्टार गौरव खन्ना याची पत्नी आणि अभिनेत्री आकांक्षा चमोला सध्या लॉक अप या रिअॅलिटी शोमधील सहभागामुळे चर्चेत आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि बिनधास्त स्वभावामुळे ती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. ( All Photos : Social Media)

टीव्हीचा सुपरस्टार गौरव खन्ना याची पत्नी आणि अभिनेत्री आकांक्षा चमोला सध्या लॉक अप या रिअॅलिटी शोमधील सहभागामुळे चर्चेत आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि बिनधास्त स्वभावामुळे ती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. ( All Photos : Social Media)

2 / 6

शोच्या एका भागात आकांक्षाने आपल्या लैंगिक ओळखीबाबत खुलासा करत आपण बायसेक्शुअल असल्याचे सांगितले. आपले मुलींकडे आकर्षण असल्याचं तिने कॅमेऱ्यासमोर स्पष्ट केलं.

3 / 6

याचदरम्यान, दुबईस्थित पामेला सेरेनासोबतचा आकांक्षाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोघी बेडवर ब्लँकेटमध्ये शिरून गप्पा मारताना दिसतात. संभाषणादरम्यान आकांक्षा म्हणाली, "मी रोज सकाळी उठते तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एक बाइट असतो." त्यावर पामेला हसत उत्तर देते, "इथली परिस्थिती खूप वाईट आहे."

4 / 6

यानंतर आकांक्षा म्हणाली, "मला फक्त पॅमचे बाइट्स आवडतात, कीटकांचे चावे नाही." पुढे ती पामेलाला सांगते की तिने एक स्वप्न पाहिलं होतं, ज्यामध्ये त्या दोघी सुट्टीसाठी गेल्या होत्या आणि छान तयार होऊन फोटो काढत होत्या.

5 / 6

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नेटकऱ्यांनी आकांक्षावर बरीच टीका केली आहे. कांहीच्या मते, शोमध्ये चर्चेत राहण्यासाठी दोघींकडून 'लेस्बियन अँगल' दाखवला जात आहे. तर हा केवळ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न आहे, असंही काहींनी म्हटलं आहे.

6 / 6

मात्र, शोमध्ये आकांक्षा आणि पामेला यांच्यात चांगली मैत्री असल्याचे वारंवार दिसून आलं आहे. दोघी अनेक प्रसंगी एकत्र दिसतात आणि एकमेकींसोबत बराच वेळ घालवताना पाहायला मिळतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us