मी बायसेक्शुअल आहे… आधी बिनधास्त बोलली, आता अभिनेत्रीला पश्चात्ताप, रितेश देशमुखने फटकारताच…

टीव्ही अभिनेत्री आकांक्षा चमोलाने 'लॉक अप 2' मध्ये आपल्या आयुष्यातील दोन मोठी गुपिते उघड केली आहेत: पती गौरव खन्नासोबतचा घटस्फोट आणि तिचे बायसेक्शुअल असणे. या गौप्यस्फोटांनी शोमध्ये खळबळ उडवली असून तिच्या या धाडसी खुलाशांची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र आता तिच्यावर नवं संकट घोंगावत आहे.

| Updated on: Jul 02, 2026 | 1:17 PM
1 / 10
टीव्ही अभिनेत्री आकांक्षा चमोला 'लॉक अप 2 ' (Lock Upp) या रिॲलिटी शोमध्ये चांगलीच चर्चेत आहे. शोच्या प्रीमियरच्या रात्रीच तिने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य सर्वांसमोर उघड केलं. (All Photos: Instagram /akankshagkhanna)

2 / 10
10 वर्षांनंतर आपलं लग्न मोडत असल्याचं तिने जाहीर केलं. ती आणि अभिनेता गौरव खन्ना घटस्फोट घेत असल्याचं तिने या शोद्वारे, टीव्हीवरून सर्वांसमोर सांगितलं. ही महत्त्वाची बाब उघड करण्यासाठी तिने आधीच आपल्या एका 'लाइफलाइन'चा वापर केला होता.

3 / 10
तर अलीकडच्या एका भागात आकांक्षाचं दुसरं गुपित उघड झालं. तिने श्रेया कालराकडे आपण 'बायसेक्शुअल' (bisexual) असल्याचं कबूल केलं होतं, परंतु आता हे गुपित देखील खाजगी राहिलेलं नाही.

4 / 10
श्रेयाने आकांक्षाचे हे गुपित सुफी मोतीवालाला सांगितलं होतं, पण याची आकांक्षाला जराही कल्पना नव्हती. 'लॉक अप 2 ' या शोचा एक नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये रितेश देशमुख याने 'जजमेंट डे'च्या दिवशी आकांक्षाला सांगितलं की तिच्याकडे आता केवळ एकच 'लाइफलाइन' शिल्लक आहे.

5 / 10
"या खेळात, तुमची गुपितं - तुमची 3 मोठी सिक्रेट्स हेच तुमची लाइफलाईन आहे, आकांक्षा, तुझ्याकडे किती लाईफलाइन शिल्लक आहेत हे तुला माहीत आहे का?" असा सवाल रितेशने तिला सर्वांसमोर विचारला.

6 / 10
त्यावर आकांक्षाने 2 असं उत्तर दिलं. मात्र त्यानंतर रितेशने तिला थांबवलं आणि तिचं उत्तर सुधारत तो तिला म्हणाला की आता तुझ्याकडे फक्त 1 लाइपलाईन आहे. तुझा्या 2 लाइफलाईन या खर्च झाल्यात, असं रितेशने सर्वांसमोर तिला सांगितलं.

7 / 10
तेव्हाच आकांक्षा हिला सूफी आणि श्रेयाचं जे बोलणं झालं, त्याच फुटेज दाखवण्यात आलं. मात्र ते सर्व पाहून तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती कॅमेऱ्यासमोरच रडताना दिसली.

8 / 10
त्यामुळे आता आकांक्षावर एलिमिनेशने संकट घोंघावत आहे.  ती खेळात टिकून राहते की तिला शोमधून लवकर बाहेर पडावं लागेल, ते या आठवड्याच्या शेवटी स्पष्ट होईल.

9 / 10
आकांक्षाने केलेल्या दोन्ही गौप्यस्फोटांनी प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. घटस्फोट होणार असल्याची घोषणा आणि आता आपण 'बायसेक्शुअल' (उभयलिंगी) असल्याचे तिने जाहीर केलं, त्यामुळे आकांक्षाच्या तिच्या व्यक्तिमत्त्वाबाबत चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

10 / 10
अभिनेता गौरव खन्ना आणि तिच्या घटस्फोटामागे हेच कारण असावं, असा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे. तरीही, या वादांकडे दुर्लक्ष करत गौरवने आकांक्षावर प्रेमाचा वर्षाव करत तिला आपली 'पत्नी' म्हणून संबोधलं होतं.

Follow Us