
अंबानींच्या पार्टीत जवळपास सर्वच बाॅलिवूड कलाकार हे पोहचले होते. फक्त कलाकारच नाही तर त्यांचे कुटुंबिय पण या पार्टीत दाखल झाले. पाहुण्यांसाठी खास जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली.

या पार्टीत अनेक बाॅलिवूड कलाकार हे धमाल करताना दिसले. अनेकांनी धमाकेदार डान्स केली. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.

अंबानींच्या पार्टी तर अक्षय कुमार हा तब्बल रात्री तीनपर्यंत डान्स करताना दिसला. याबद्दल स्वत: अक्षय कुमार याने भाष्य केले. अंबानी कुटुंबाकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल अक्षय कुमार बोलला.

दुसरीकडे अक्षय कुमार याच्या डान्सची खिल्ली उडवताना त्याची पत्नी ट्विंकल खन्ना ही दिसली. ट्विंकल खन्ना म्हणाली, अक्षयचा अंबानींच्या पार्टीतील डान्स पाहून असे वाटते होते की, तो तेलाची विहिर खोदत आहे.

चक्क अक्षय कुमारच्या डान्सची खिल्ली उडवताना ट्विंकल खन्ना ही दिसली आहे. आता ट्विंकल खन्ना हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.