AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोने आणि चांदी दोघांची एकसाथ घसरण, फेडरल बँकेचा निर्णय आणि युद्धाचा परिणाम

पश्चिम आशियातील अशांततेचा फटका सोने आणि चांदीच्या दरांना बसला आहे. चांदीची सर्वोच्च घसरण झाली आहे. तर सोन्याचे दरही कोसळले आहे.

सोने आणि चांदी दोघांची एकसाथ घसरण, फेडरल बँकेचा निर्णय आणि युद्धाचा परिणाम
GOLD AND SILVER
| Updated on: Mar 19, 2026 | 8:37 PM
Share

इराण युद्धाच्या रणधुमाळीत आज चांदीची किंमत मोठ्या प्रमाणावर कोसळली आहे. गुरुवारी मल्टी कमोडीटी एक्स्चेंज (MCX ) वर चांदीची किंमत पाहाता पाहाता कोसळली. सायंकाळी ६.१५ वाजता चांदी १२ टक्के घसरणीसह लोअर सर्कीट लागला. म्हणजे झटक्यात चांदी २९ हजार रुपयांनी स्वस्त झाली. या ताज्या घसरणीनंतर चांदी तिच्या ऑल टाईम हाय दरापासून २ लाख रुपयांवरुन जास्त घसरली आहे. दुसरीकडे सोन्याने देखील मान टाकली आहे. मल्टी कमोडीटी एक्स्चेंजवर सोने सहा टक्के घसरले आहे. ज्यामुळे सोन्याची किंमत ९ हजार रुपयांनी कोसळली आहे. अमेरिकेच्या फेड रिझर्व्ह बँकेद्वारे पॉलीसी रेटला स्थिर ठेवण्याशिवाय युद्ध परिस्थिती जोरदार विक्री झाल्याने सोने आणि चांदीचे दर जोरदार घसरले आहेत.

आठवड्याच्या चौथ्या कामकाच्या दिवशी गुरुवारी मल्टी कमोडीटी एक्स्चेंज बाजार सुरु होताच चांदीचा वायदा भाव बुधवारी बंद झालेल्या २,४८,१९४ रुपयांवरुन कोसळून ओपन झाला. बातमी लिहीपर्यंत चांदीचा भाव १२ टक्के कोसळून २,१८,४११ रुपये प्रति किलोवर आला. त्यामुळे १ किलो चांदीची किंमत २९,७०० रुपयांनी कोसळली आहे. चांदीचा आतापर्यंतचा सर्वाधिक दर २९ जानेवारी रोजी ४,२०,०४८ रुपये प्रति किलो होता. या दरात आतापर्यंत खूपच घसरण झाला आहे.ताजी घसरण पाहाता चांदी सर्वोच्च दराहून आता २ लाख रुपये प्रति किलो स्वस्त झाली आहे.

चांदीत मोठी घसरण

चांदीसोबतच,सोन्याच्या दरातही मोठी घसरण दिसत आहे. मल्टी कमोडीटी एक्स्चेंज MCX वर बुधवारी सोन्याचा भाव १० ग्रॅममागे १,५३,०२५ रुपयांवर बंद झाला होता. ; मात्र, गुरुवारी त्यात ६% ची मोठी घसरण होऊन तो १,४३,८४४ रुपयांवर पोहोचला. याचा अर्थ असा की, २४-कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा दर ९,००० रुपयाने कमी झाला आहे. शिवाय, सोन्याच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च दराशी जो १,९३,०९६ रुपये इतका होता. तुलना करता, सोन्याचा वायदा भाव सध्या ५०,००० रुपयांच्या सवलतीवर  व्यवहार करत आहेत.

सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीची कारणे

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.मध्यपूर्वेतील संघर्षामुळे वाढलेला जागतिक तणाव आता अत्यंत गंभीर पातळीवर पोहोचला असून, त्यामुळे आर्थिक भवितव्य अंधकारमय दिसत आहे असे कारण यामागे देण्यात आले आहे. फेडरल रिझर्व्ह बँकेच्या या भूमिकेमुळे सोने आणि चांदी या दोन्हीच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे.

गुंतवणूकदार आता अमेरिकन डॉलरकडे ?

स्ट्रेट ऑफ होर्मुझ ठप्प होण्याची शक्यता आणि आखाती देशांमधील तेल आणि वायू प्रकल्पांवर झालेले हल्ले, यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वेगाने वाढ झाली आहे. या परिस्थितीमुळे जागतिक महागाईचे सावट निर्माण झाले आहे. शिवाय, गुंतवणूकदार आता अमेरिकन डॉलरकडे वळत आहेत. ज्याला ‘सुरक्षित चलन’ मानले जाते. आणि अलीकडच्या काही दिवसांत डॉलरचे मूल्य लक्षणीयरीत्या वधारले आहे. सोन्या आणि चांदीच्या दरातील ही घसरण प्रामुख्याने उच्च धोरणात्मक व्याजदर आणि अमेरिकन डॉलरची वाढती ताकद या कारणांमुळे ही घसरण झाली असल्याचे मानले जात आहे.

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच