
अजय देवगण आणि अक्षय कुमारने वर्ष 1991 मध्ये आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. दोघांनी एकत्र काम केलेला सिंघम अगेन चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही. 30 वर्षांपूर्वी अक्षय कुमारच्या एका निर्णयामुळे अजय देवगणला भरपूर फायदा झालेला. अक्षय कुमारने अजय देवगणच नशीब पलटवलेलं.

अजय देवगणने 1991 साली हिंदी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं. फूल और कांटे त्याचा पहिला चित्रपट होता. अजयने पहिल्याच चित्रपटाद्वारे मोठा धमाका केला. त्याचं काम लोकांना खूप आवडलेलं. अनेकांनी त्याच्या अभिनयाच कौतुक केलेलं. वर्ष 1992 मध्ये अजय देवगणचा जिगर चित्रपट बॉक्स ऑफिसवर आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

अजय देवगणने सुरुवातीला दोन हिट चित्रपट दिले. त्यानंतर तो इंडस्ट्रीत स्वत:ला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता. पण अचानक त्याचे वाईट दिवस सुरु झालेत. वर्ष 1993 मध्ये अजय देवगणच्या वाट्याला अपयश आलं. त्याच्यासाठी हे वर्ष आव्हानात्मक होतं. त्या वर्षी त्याचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटलेला.

अजय देवगणच्या चित्रपटाची स्थिती पाहून त्याचं करिअर बुडणार असं अनेकांना वाटलेलं. पण 1994 साली अजय देवगणला असा चित्रपट मिळाला. त्याने तो मोठा स्टार बनला. पण हा चित्रपट त्याला अक्षय कुमारच्या नकारामुळे मिळाला होता. हा चित्रपट होता 'दिलवाले'.

'दिलवाले' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व निर्माण केलं. हा चित्रपट तुफान चालला. अजय देवगणशिवाय सुनील शेट्टी आणि रवीन टंडन या चित्रपटात लीड रोलमध्ये होते. हा एक रोमँटिक एक्शन ड्रामा चित्रपट होता. अजयसोबत सुनील शेट्टीचे सुद्धा खराब सुरु असलेले दिवस पालटले.