AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प झुकणार? इराणने रडारला न सापडणारे F35 फायटर जेट उडवलं, अमेरिकेचे सर्वात मोठे नुकसान

Iran vs US : युद्धाच्या 20व्या दिवशी इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका दिला आहे. इराणने प्रथमच अमेरिकेच्या स्टेल्थ फायटर जेट F-35 Lightning II हवेत उडवलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प झुकणार? इराणने रडारला न सापडणारे F35 फायटर जेट उडवलं, अमेरिकेचे सर्वात मोठे नुकसान
F 35Image Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 19, 2026 | 10:57 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाच्या 20व्या दिवशी इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका दिला आहे. इराणने प्रथमच अमेरिकेच्या स्टेल्थ फायटर जेट F-35 Lightning II हवेत उडवलं आहे. यामुळे त्या अमेरिकन लढाऊ विमानाला आपत्कालीन लँडिंग करावी लागली. सूत्रांच्या हवाल्याने CNN ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, एका अमेरिकन F-35 विमानाला मिडल ईस्टमधील अमेरिकन एअर बेसवर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. या विमानावर इराणकडून हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. इराणच्या IRGC ने देखील अमेरिकन फायटर जेटला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का

अमेरिकन सेंट्रल कमांडचे प्रवक्ते प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी सांगितले की, फिफ्थ जनरेशन स्टेल्थ जेट इराणच्या वर कॉम्बॅट मिशनवर असताना त्याला हिट करण्यात आले. त्यानंतर जेटची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. त्यांनी विमान सुरक्षितपणे उतरले असून या घटनेची चौकशी सुरू आहे. टिम हॉकिन्स यांनी पुढे सांगितले की, ‘विमान सुरक्षितपणे उतरले आहे आणि पायलटची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे.’

समोर आलेल्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या संघर्षात इराणने प्रथमच अमेरिकन फायटर जेटला लक्ष्य केले आहे. या युद्धात अमेरिका आणि इस्रायल दोघेही F-35 सारख्या आधुनिक लढाऊ विमानांचा वापर करत आहेत. या विमानाची किंमत सुमारे 100 मिलियन डॉलर (800 कोटी रुपयांपेक्षा अधिक) आहे.

ही घटना का महत्त्वाची आहे?

ही घटना अनेक कारणांमुळे अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पहिल्यांदाच इराणने थेट अमेरिकन विमानाला लक्ष्य केले असण्याची शक्यता आहे. यावरून इराणची हवाई संरक्षण क्षमता अजूनही प्रभावी असल्याचे समोर आले आहे. F-35 हे अत्याधुनिक स्टेल्थ फायटर जेट असून ते रडारपासून लपण्यास सक्षम आहे, तरीदेखील ते इराणच्या हल्ल्याचे लक्ष्य बनले. त्यामुळे अशा प्रगत विमानाला नुकसान होणे ही मोठी बाब मानली जात आहे. त्यामुळे आता अमेरिका काय रणनिती अवलंबणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश