
चित्रपट सृष्टीत अशी अनेक जोडपी आहेत, जी लोकांना खूप भावतात. त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा खास असते. यापैकीच एक आहे खिलाडी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना. अक्षय कुमारने अलीकडेच एका इंटरव्यूमध्ये खुलासा केला. त्याने त्याच्या आणि ट्विंकलच्या लग्नासाठी आमिर खानचे आभार मानले. याचं कारण आमिर खान आणि ट्विंकलची फिल्म 'मेला' शी संबंधित आहे.

अक्षय कुमारने सांगितलं की, त्याने ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. पण ट्विंकल लग्नासाठी तयार नव्हती. त्यावेळी ट्विंकल अक्षय कुमारला म्हणालेली की, मेला चित्रपट फ्लॉप झाला, तर तुझ्याशी लग्न करेन.

त्यावेळी सर्वांना असं वाटलेलं की, मेला बॉक्स ऑफिसवर चांगलं परफॉर्म करेल. पण मेला चित्रपट फ्लॉप झाला. मेला चित्रपटाच्याच वेळी अक्षय आणि ट्विंकलची भेट झालेली. ही मैत्री लगेच प्रेमात बदलली.

अभिनेत्रीने आपला शब्द पाळत 17 जानेवारी 2001 रोजी अक्षय कुमारसोबत लग्न केलं. अक्षय हा किस्सा आठवत मस्करीत बोलला की, माफ कर आमिर भाई, तुझा चित्रपट चालला नाही. पण मी तुझा आभारी आहे. तुझ्यामुळे मला टि्वंकल मिळाली.

आजही ही जोडी बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. ट्विंकलने अनेक चित्रपट केले. पण तिला करिअरमध्ये फार यश मिळालं नाही. त्या तुलनेत अक्षय कुमारने भरपूर यश कमावलं.