
शिल्पा शेट्टी आणि रविना टंडनच नाही, अक्षय कुमारच नाव आणखी एका अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं.

ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नाही, प्रियांका चोप्रा होती. प्रियांका आणि अक्षयच्या अफेअरची एकवेळ खूप चर्चा होती.

अक्षय आणि प्रियांकाने एकापाठोपाठ एक चार चित्रपटात एकत्र काम केलं होतं. दोघांमध्ये जवळीक वाढू लागली होती.

ट्विंकल खन्नाला जेव्हा अक्षय-प्रियांकाबद्दल सुरु असलेल्या चर्चांबद्दल समजलं, तेव्हा ती प्रचंड खवळलेली. असं म्हणतात की, ट्विंकलने त्याचवेळी प्रियांकाला फोन केला व तिला खूप सुनावलं होतं. एका रिपोर्ट्नुसार तर ट्विंकल चित्रपटाच्या सेटवर प्रियांकाशी वाद घालण्यासाठी पोहोचली होती.

प्रियांका तिला तिथे भेटली नाही. अक्षय कुमारने स्वत:चा संसार वाचवण्यासाठी तेव्हा सर्वांसमोर घोषणा केली की, यापुढे तो प्रियांकासोबत चित्रपट करणार नाही.