
जागतिक स्तरावरील खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळख असलेल्य लोणार येथील सरोवरात चक्क मासे आढळल्याने आता खळबळ उडाली आहे. सरोवरातील जैवविविधता धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

या सरोवराला अनेक अभ्यासक , संशोधक भेट देण्यासाठी येत असतात. मात्र आता मासे आढळल्याने जैवविविधता धोक्यात आले आहे . यावर्षी कधी नव्हे सरोवराचे पाणी पातळी सुद्धा वाढली आहे.

लोणार सरोवरातील पाणी हे अत्यंत अल्कधर्मी असल्याने यातच कधीही इतिहासात सजीव सृष्टी आढळल्याची नोंद नाही, ते जगातील असे एकमेव सरोवर आहे. सरोवरातील अल्कधर्मी पाणी असल्यामुळे यात कुठलेही मासे किंवा जीव जंतू जगू शकत नाही.

लोणार सरोवर उल्कापातामुळे तयार झाले होते आणि त्याचे पाणी खारट आणि क्षारीय आहे. पाण्याचा रंग बदलल्याने आणि खारटपणामुळे त्यात जीवसृष्टी दिसत नाही.

मात्र, आता लोणार सरोवरातील पाण्याचे गुणधर्म बदलत असल्याने यात सजीव सृष्टी निर्माण होताना दिसत आहे . या सरोवरच चक्क मासे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. अचानक मासे दिसल्याने सरोवराचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिंता निर्माण झाली आहे.

यंदा या परिसरात मोठ्या प्रमाणात अनेकदा अतिवृष्टी झाली. लोणार शहरातील सांडपाणी सरोवरात थेट जाऊ नये म्हणून NEERI संस्थेने याठिकाणी प्रकल्प उभारला होता तोही धुळखात पडून आहे. शिवाय लोणार शहरातील सांडपाणी सरळ या सरोवरात मिसळलं जात असल्याने सरोवराची पाण्याची पातळी इतिहासात यंदा रेकॉर्ड ब्रेक वाढली.

त्यामुळे या सरोवरातील पाण्यात सजीव सृष्टी निर्माण होऊन भविष्यात लोणार सरोवराच अस्तित्वच धोक्यात येईल . जी सजीव सृष्टी निर्माण होत आहे ही कदाचित पर्यावरण व मानव जातीला धोकादायक ठरू शकते असं तज्ञांचे मत आहे.

त्यामुळे या सरोवरातील पाण्यात सजीव सृष्टी निर्माण होऊन भविष्यात लोणार सरोवराच अस्तित्वच धोक्यात येईल . जी सजीव सृष्टी निर्माण होत आहे ही कदाचित पर्यावरण व मानव जातीला धोकादायक ठरू शकते असं तज्ञांचे मत आहे.