Alia Bhatt Alpha : आलिया भट्टचा ‘अल्फा’ निघाला फुस्स, YRF स्पाय युनिवर्सला पैसे छापून देण्यात शाहरुख, सलमान खूप पुढे
Alia Bhatt Alpha : आलिया भट्ट आणि शरवरी वाघ यांचा बहुचर्चित 'अल्फा' चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. YRF स्पाय युनिवर्सकडे एकापेक्षा एक तगडे ओपनिंग देणारे चित्रपट आहेत. या शर्यतीत आलिया भट्टचा 'अल्फा' फुस्स ठरला आहे.

YRF स्पाय युनिवर्सचा अलीकडेच 'अल्फा' चित्रपट रिलीज झाला. आलिया भट्टच्या या सिनेमाने ओपनिंग डे वर बॉक्स ऑफिसवर 9 कोटीची कमाई केली. बॉबी देओलच्या या सिनेमाचं वर्ल्डवाइड कलेक्शन 16.10 कोटी रुपये आहे. 'अल्फा' हा YRF स्पाय युनिवर्सचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट नाहीय.

ऋतिक रोशनचा 'वॉर' वर्ष 2019 मध्ये रिलीज झालेला. पहिल्याच दिवशी भारतात या चित्रपटाने 53.35 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. या फिल्म मध्ये टायगर श्रॉफ सुद्धा आहे. जगभरात या सिनेमाने 471 कोटींची कमाई केली होती.

सलमान खानच्या टायगर फ्रेंचायजीचे आतापर्यंत तीन सिनेमे आलेत. 2012 साली एक था टायगर. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 32 कोटीपेक्षा जास्त कमाई केलेली. त्यानंतर 2017 साली टायगर जिंदा हैं. ओपनिंग डे ला या चित्रपटाने 34 कोटीपेक्षा जास्त कमाई केली. 2023 साली आलेल्या टायगर 3 ने 44.50 कोटींची ओपनिंग केलेली.

2023 साली आलेल्या शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटीपेक्षा जास्तची कमाई केली. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 55 कोटींचा गल्ला जमवलेला. खूप शानदार आकाडा आहे हा.

YRF स्पाय यूनिवर्स मध्ये सर्वाधिक कमाई करणारा शाहरुख खानचा पठाण चित्रपट आहे. या चित्रपटाने YRF ला तगडा फायदा करुन दिला होता. त्यानंतर रिलीज झालेला कुठलाही चित्रपट इतकी खास कमाई करु शकलेला नाही. पठाण YRF स्पाय यूनिवर्सचा ओपनिंग डे ला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.