
करण जोहर याचा शो कॉफी विथ करण 8 चा एक प्रोमो हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या प्रोमोमध्ये कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये आलिया भट्ट आणि करिना कपूर खान या एकसोबत आल्याचे बघायला मिळतंय.

यावेळी आलिया भट्ट हिने म्हटले की, राहा हिच्यामुळे अनेकदा माझ्यामध्ये आणि रणबीर कपूरमध्ये छोटे मोठे वाद हे कायमच होतात. त्याचे कारण म्हणजे राहा हिला जास्त वेळ कोण जवळ ठेवणार म्हणून.

हे वाद मिटवण्यासाठी करीना कपूर हिने आलिया भट्ट हिला अत्यंत मोठा सल्ला दिला. करीना कपूर म्हणाली की, हे वाद मिटवण्यासाठी एकच उपाय आहे की, तू अजून एका बाळाला जन्म दे.

करीना कपूर हिचे हे बोलणे ऐकून करण जोहर हा मोठ्याने थेट हसताना दिसला. मात्र, यावर फार काही बोलताना आलिया भट्ट ही दिसत नाहीये. म्हणजे तिला करीना हिचे हे बोलणे जास्त आवडलेले दिसत नाहीये.

गेल्या काही दिवसांपासून करण जोहर याच्या शोमध्ये अनेक मोठे कलाकार हे येताना दिसत आहेत. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह देखील या शोमध्ये सहभागी झाले होते.