
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने तिच्या प्रतिभेने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आलिया भट्ट देखील तिचे लूक्स आणि अभिनय कौशल्याने चाहत्यांना मोहित करते. दोन्ही सुंदरी कपूर कुटुंबातील आहेत. एक कपूर खानदानाची लेक तर दुसरी सून आहे.

करीना ही रणधीर कपूर याची मुलगी आहे, तर आलिया ही दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची सून, रणबीर कपूरची पत्नी आहे. पण करिना आणि आलियामध्ये कोणाकडे जास्त संपत्ती आहे, तुम्हाला माहीत आहे का ? जाणून घेऊया दोघींचं नेटवर्थ

करीना कपूरने 2000 साली अभिषेक बच्चनसोबत 'रेफ्युजी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आपल्या 25 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अभिनेत्रीने 'जब वी मेट', 'कभी खुशी कभी गम', 'ऐतराज' आणि 'अंग्रेजी मीडियम' सारखे हिट चित्रपट दिले आहेत.

करीना कपूर सध्या 45 वर्षांची आहे आणि अजूनही चित्रपटांमध्ये सतत सक्रिय आहे.तिचे आगामी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, करीना ही एका चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी रुपये आकारते.

करीना ब्रँड एंडोर्समेंटमधूनही बक्कळ पैसा कमवते, तसेच तिने रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, करीना कपूरची एकूण संपत्ती 485 कोटी रुपये आहे.

2012 साली रिलीज झालेल्या "स्टुडंट ऑफ द इयर" या चित्रपटातून आलिया भट्टने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.तिने "राझी," "गली बॉय," "गंगूबाई काठियावाडी," आणि "रॉकी और रानी की प्रेम कहानी" यासारखे एकाहून एक हिट चित्रपट दिले.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आलिया तिच्या एका चित्रपटासाठी 15 कोटी रुपये आकारते. तिची एकूण संपत्ती 550 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

आलियाला चित्रपटसृष्टीत येऊन 13 वर्षे झाली आहेत आणि तिचे सरस चित्रपट दरवर्षी प्रदर्शित होतात. पण ती, तिची नणंद करीनापेक्षा एका चित्रपटासाठी जास्त फी घेते.

त्यामुळे संपत्तीच्या बाबतीत कपूर घराण्याती सूनबाई या करीना कपूरपेक्षा पुढे आहेत, ती जास्त श्रीमंत आहे.