Alia Bhatt : ‘गर्ल्स गँग’सोबत आलिया भट्टची धमाल; शेअर केले व्हेकेशनचे खास फोटो !
Alia Bhatt : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या पती रणबीर कपूर आणि फॅमिली पासून दूर आहे. आलिया तिच्या मैत्रिणींसोबत सुट्टीचा आनंद घेत्ये. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही खास फोटो शेअर करत सुंदर कॅप्शनही दिली आहे.

Alia Bhatt : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने सध्या कामातून थोडा ब्रेक घेतला असून ती सुट्टी एन्जॉय करत्ये. पण फॅमिलीसोबत नव्हे तर, तिच्या खास मैत्रिणींसह.. हो, हे खरं आहे. नुकतेच आलियाने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर व्हेकेशनचे काही खास फोटे शेअर केलेत. (All Photos : Instagram / Alia Bhatt)
या फोटोंमध्ये आलिया आणि तिची 'गर्ल्स गँग' सुट्टी एन्जॉय करत धमाल करताना दिसत आहेत. त्याने वेगवेगळ्या, मस्तीभऱ्या अंदाजात पोझ देते भरपूर फोटो क्लिक केले. कधी आलियाने मैत्रीणींलब हसत सेल्फी घेताना दिसली, तर एका फोटोत ती लाल रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये सुंदर स्माइल करत पोझे देत होती. या फोटोंमधून त्यांचं खास बाँडिंग आणि व्हेकेशन व्हाईब स्पष्टपणे दिसली.
मात्र या फोटोंपेक्षा जास्त चर्चा आलियाने दिलेल्या कॅप्शनची होत आहे. तिने इन्स्टा अकाऊंटवर फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं - Jee le zaraa.... तिची कॅप्शन आणि व्हेकेशन फोटो पाहून चाहते खूपच आनंदी आणइ उत्साहित आझले.अनेकांनी लाइक करत त्यावर बऱ्याच कमेंट्सही केल्या.
खरं तर, फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' सिनेमात आलिया भट्ट, प्रियंका चोपड़ा आणि कॅटरीना कैफ एकत्र दिसतील अशा चर्चा होत्या. पण त्या प्रोजेक्टबाबत अजून काही अपडेट्स समोर आलेले नाहीत. मात्र असं असलं तरी आलियाने आता या'गर्ल्स ट्रिप'च्या फोटोवर ही कॅप्शन दिल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
सोशल मीडियावर आलियाचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. आणि तिच्या फॅन्स कॉमेंट सेक्शनमध्ये लूक आणि त्यांच्या गर्लगँगच्या बॉंडिंगची जोरदार चर्चा होत आहे.