
अभिनेत्री आलिया भट्ट कायम तिच्या लूक आणि अभिनयामुळे चर्चेत असते. आलिया सोशल मीडियावर कायम फोटो पोस्ट करत असते. आता देखील आलियाने काही फोटो पोस्ट केले आहेत.

ज्यामध्ये अभिनेत्री अतिशय रॉयल आणि ग्लॅमरस दिसत आहे. क्लासी ड्रेस, मोकळे आणि सरळ केसांत आलिया चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे. सध्या आलिया काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

अनेकांना आलियाचा नवा लूक आवडला आहे. तर अनेकांनी अभिनेत्रीवर टीका केली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला आलिया फॉलो करतेय असे अनेक नेटकरी कमेंट करत म्हणाले आहेत.

सांगायचं झालं तर, एका मुलीची आई झाल्यानंतर देखील अभिनेत्री आलिया भट्ट हिचं फिटनेस कायम आहे. आता देखील अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आलिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.