
कोरफड आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोरफड त्वचा, शरीर आणि केसांसाठी फायदेशीर ठरते. फक्त केसांना आणि त्वचेला लावण्यापर्यंतच कोरफड फायदेशीर नाही तर त्याचे सेवनही आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

जर तुम्ही कोरफडचे सेवन केले तर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे उपाशीपोटी कोरफडच्या ज्यूसचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरते.

सकाळी उठल्यावर कोरफडच्या ज्यूसचे सेवन करा. कोरफडच्या ज्यूसचे सेवन केल्याने पचनासंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. अजिबातच पचनाची समस्या राहणार नाही.

बऱ्याच लोकांना आम्लपित्ताची समस्या असते. यामुळे त्यांना काहीच खाता पिता येत नाही. जर तुम्हाला जरी आम्लपित्ताची समस्या असेल तर कोरफडीच्या ज्यूसचे सेवन करा.

विशेष म्हणजे जर तुम्ही दररोज सकाळी कोरफडीचे सेवन केले तर तुमच्या त्वचेच्या असंख्य समस्या कमी होतील आणि तजेलदार आणि निरोगी त्वचा तुम्हाला मिळेल.