AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण होता रेहमान डकैत? ‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाने साकारली गँगस्टरची भूमिका, आईची हत्या करून कापलेल्या शिराने खेळला होता फुटबॉल

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटात जरी अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असला तरी सध्या सर्वत्र अक्षय खन्नाचं कौतुक होत आहे. या स्पाय थ्रिलरमध्ये त्याने रेहमान बलोच उर्फ रेहमान डकैतची भूमिका साकारली आहे.

कोण होता रेहमान डकैत? 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाने साकारली गँगस्टरची भूमिका, आईची हत्या करून कापलेल्या शिराने खेळला होता फुटबॉल
Akshay Khanna in DhurandharImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 08, 2025 | 8:11 PM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या स्पाय थ्रिलरमध्ये जरी अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असला तरी अक्षय खन्नाचं सर्वत्र कौतुक होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अक्षय यात हिरोच्या नव्हे तर सर्वांत क्रूर गँगस्टरच्या भूमिकेत आहे. अक्षयने यामध्ये रेहमान बलोच उर्फ रेहमान डकैतची भूमिका साकारली आहे. पडद्यावर तो जितका क्रूर दाखवण्यात आला आहे, तितकाच तो खऱ्या आयुष्यातही होता का, याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. धुरंधर हा चित्रपट वास्तविक घटनांपासून प्रेरित आहे. 2000 दशकाच्या अखेरीस कराचीमधल्या ल्यारी या गँगस्टरच्या अड्ड्यावर ही कथा घडते. यामध्ये अक्षय रेहमानच्या भूमिकेत असून तो चुलत भाऊ आणि सेकंड-इन-कमांड उजैर बलुचसोबत ल्यारीवर राज्य करतो. तर रणवीर सिंह यामध्ये हमजाच्या भूमिकेत असून तो गुप्तहेर असतो.

रेहमान डकैत कोण होता?

खऱ्या आयुष्यातील रेहमान डकैतचं संपूर्ण नाव सरदार अब्दुल रेहमान बलुच होतं. तो पाकिस्तानी गँगस्टर होता आणि 2000 च्या दशकात त्याने ल्यारीमध्ये दहशत माजवली होती. 1975 मध्ये त्याचा जन्म झाला होता. कमी वयातच त्याने ल्यारीमध्ये ड्रग्ज विकण्यास सुरुवात केली होती. वयाच्या 13 व्या वर्षीच त्याने पहिल्यांदा हिंसा घडवून आणली होती. एका व्यक्तीची त्याने चाकूने हत्या केली होती. इतकंच नव्हे तर वयाच्या 19 व्या वर्षी त्याने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. रेहमानने त्याच्या आईचीच हत्या केली होती.

धुरंधर या चित्रपटातील एका महत्त्वपूर्ण सीनमध्ये ही घटना काहीशा क्रिएटिव्ह लिबर्टीसह दाखवली आहे. रेहमान नव्वदच्या दशकाच्या अखेरीस हाजी लालूच्या गँगमध्ये सामील होतो आणि 2001 मध्ये लालूच्या अटकेनंतर गँगची कमान सांभाळतो. त्यानंतर पुढच्या आठ वर्षांपर्यंत तो ल्यारीला स्वत:चा अड्डा बनवतो. यामध्ये उजैर आणि त्याचा साथीदार बाबा लाडला त्याचे विश्वासू असतात.

डेली गार्डियनच्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की रेहमानच्या आदेशानंतर लाडला आणि बलूच त्यांची ताकद आणि दहशत दाखवण्यासाठी ते शत्रूंचं धड शिरापासून वेगळं करून त्याने फूटबॉल खेळायचे. ऑगस्ट 2009 मध्ये ल्यारी गँगवर सरकारने केलेल्या कारवाईदरम्यान रेहमानची हत्या झाली. त्यावेळी तो 34 वर्षांचा होता. रेहमानच्या मृत्यूनंतर त्याचा चुलत भाऊ उजैरने गँगची कमान सांभाळली होती.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंच्या अटकेची मागणी
सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
Bhimashankar Torrent Project : Raj Thackeray : सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर, सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष
कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती मतांची गरज....
Harshada Deshmukh : Maharashtra MLC Election Final Results 2026 : कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती  मतांची गरज; पुणे पदवीधर निवडणुकीत काय घडणार?
नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर?
Maharashtra MLC Election Result 2026 : नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर? विधान परिषद निवडणुकीचे ताजे चित्र
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z