AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातला हा छोटा मुस्लीम देश छापतो सर्वात महागडी नोट, भारतीय चलनातील किंमत ऐकून बसेल धक्का!

जगातील एका छोट्या मुस्लीम देशाच्या नोटेची ताकद इतकी आहे. भारतीय करन्सीत याची किंमत इतकी जास्त आहे की तुम्हाला विश्वास बसणार नाही.

जगातला हा छोटा मुस्लीम देश छापतो सर्वात महागडी नोट, भारतीय चलनातील किंमत ऐकून बसेल धक्का!
Currency
| Updated on: Dec 08, 2025 | 8:24 PM
Share

जगातील ताकदवान चलनाचा जेव्हा विषय निघतो तेव्हा सुपर पॉवर अमेरिकेच्या डॉलर किंवा युरोचा उल्लेख होत असतो. परंतू जगात एक अशीही नोट आहे जिचे भारतात मुल्य सुमारे सात लाख रुपये आहे. ही नोट ब्रुनेई देशाची आहे. ही ब्रुनेई देशाची 10,000 डॉलरची उच्च मुल्याची नोट आहे. ज्याची भारतीय चलनातील किंमत सुमारे 6.8 लाख रुपये इतकी जास्त आहे.

परंतू ही रक्कम इतकी मोठी आहे की यास पाहून कोणालाही धक्का बसेल.वाईस डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार एका ब्रुनेई डॉलरची किंमत भारतीय चलनात 69.61 रुपये आहे.

ब्रुनेई दक्षिण- पूर्व आशियातील खूपच छोटा, परंतू अत्यंत संपन्न देश आहे. या देशाच्या संपन्नतेचा मुख्य आधार तेथील तेल आणि नैसर्गिक गॅसचे अमुल्य भंडार आहे. देशाची लोकसंख्या सुमारे 5 लाखाच्या आसपास आहे. या देशाच्या कमाईचा परिणाम या देशाच्या नागरिकाच्या राहाणीमानाच्या दर्जावर देखील दिसतो. याचे कारण त्याच्या चलनाची मजबूती जगात एक मिसाल म्हणून ओळखली जाते.

10,000 ब्रुनेई डॉलर—जगातील महाग नोट

ब्रुनेईच्या या विशेष मुल्यवर्गाची नोट जगातील त्या मोजक्याच चलनापैकी आहेत. ज्याच्या एका युनिटची किंमत इतकी जास्त आहे. 10,000 ब्रुनेई डॉलरला एका अमेरिकन डॉलरमध्ये बदलते तर त्याची व्हॅल्यू सुमारे 7,770 USD आहे. ब्रुनेई या नोटेला मर्यादित प्रमाणात छापतो आणि या नोटेला सुरक्षित देखील केले आहे. यामुळे या नोटेला खूपच प्रतिष्ठीत मानले जाते.

ब्रुनेई डॉलर आणि सिंगापुर डॉलरची किंमत एक

ब्रुनेई आणि सिंगापुर या देशांदरम्यान 1967 रोजी एक महत्वाचा करार झाला आहे. ज्याअंतर्गत दोन्ही देशांच्या चलनाचे मूल्य सारखे ठेवण्यात आले. आज देखील ब्रुनेई डॉलर आणि सिंगापूरी डॉलरचा दर एकच आहे. दोन्ही देश एकमेकांची करन्सी स्वीकार करतात. ही व्यवस्था ब्रुनेई चलनाला अधिक विश्वासार्ह बनवते.

ब्रुनेईची आर्थिक पाया इतका मजबूत का ?

देशाची आर्थिक ताकद त्याच्या तेल आणि गॅस निर्यातीतून येते. ब्रुनेई सरकारच्या जवळ विशाल कॅश रिझर्व्ह आहे. देशाचे कर्ज जगातील सर्वात कमी मानले जाते. हे कर्ज जीडीपीच्या तुलनेत केवळ 1.9 टक्के आहे. लोकसंख्या कमी आणि नैसर्गिक साधन संपत्ती जास्त असल्याने ब्रुनेईतील प्रति व्यक्ती उत्पन्न आशियातील सर्वात जास्त आहे. हेच कारण आहे की या देशाची करन्सी जगातील सर्वात मजबूत आणि स्थिर चलनात मोजली जाते.

छोटा देश परंतू मजबूत करन्सी

ब्रुनेईने तिच्या नैसर्गिक संपत्ती आणि सुव्यवस्थित आर्थिक धोरणाच्या आधारावर प्रतिष्ठा मिळवली आहे.ज्याच्या जवळ अनेक मोठे देश देखील गेले नाहीत. त्यांची 10,000 डॉलरवाली नोट केवळ कागदाचा तुकडा नाही. तर त्याच्या आर्थिक शक्तीचे प्रतिक आहे.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.