
Amazfit GTR मिनी Zepp OS 2.0 चालतं. स्मार्टवॉच 5 सॅटेलाईट पोझिशनिंग सिस्टमला सपोर्ट करते. हार्ट रेट आणि एसपीओ2 सेंसरसह येते. यात तीन रंगाचे पर्याय उपलब्ध आहेत. मिडनाइट ब्लॅक, मिस्टी पिंक आणि ओशन ब्लू या रंगाचा समावेश आहे. (फोटो:Amazfit)

जीटीआर मिनीमध्ये 1.28 इंचाचा एचडी अमोलेड राउंड डिस्प्ले आणि ग्लेझ्ड बॅक पॅनल आहे. यात स्टेनलेस स्टील फ्रेम आहे. त्याचबरोबर स्किन फ्रेंडली सिलिकॉन बेल्ट आहे. स्मार्टफोनचं वजन 24.6 ग्राम आहे. (फोटो:Amazfit)

हेल्थ फीचर्ससाठी Zepp OS 2.0 हेल्थ संट्रिक अप्रोच पर्याय निवडते. अॅडव्हान्स बायो ट्रॅकर पीपीजी ऑप्टिकल सेंसरवर डिपेंड करतं. हे सेंसर हार्ट रेट, ब्लड ऑस्किजन सेचुरेशन मोजते. (फोटो:Amazfit)

कंपनीच्या म्हणण्यानुसार, युजर्स केवळ 15 सेकंदात एका टॅपने हे मेट्रिक्स तपासू शकतात. याशिवाय, 120 हून अधिक स्पोर्ट्स मोड आहेत आणि सात व्यायाम प्रकारांची स्मार्ट ओळख पटवण्यासाठी 'ExerSense' आहे. (फोटो:Amazfit)

जीटीआर मिनीमध्ये ड्युअल कोर Huangshan 2S चिपसेट आहे. हे घड्याळ बॅटरीवर 14 दिवस आणि बॅटरी सेव्हर मोडवर 20 दिवस चालते, असा कंपनीचा दावा आहे. (फोटो:Amazfit)