
अॅमेझॉन प्राईमकडून मासिक आणि तिमाही सबस्क्रिप्शनच्या दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अॅमेझॉनच्या तिमाही योजनेची किंमत 329 रुपयांवरून 459 रुपयांपर्यंत वाढेल, तर त्याच्या मासिक योजनेची किंमत 129 रुपयांवरून 179 रुपयांपर्यंत वाढेल. मात्र हे नवे दर कधी लागू होतील याबाबत कंपनीने काहीही सांगितले नाही. कंपनीने फक्त एवढेच सांगितले आहे की हे नवीन दर लवकरच लागू होतील.

अॅमेझॉन

अमेझॉनने स्पष्ट केले की ज्या वापरकर्त्यांनी आधीच योजना घेतली आहे त्यांना या नव्या दरांमुळे प्रभावित होणार नाही. ते त्यांच्या योजनेचा कालावधी संपेपर्यंत कोणत्याही व्यत्ययाशिवाय त्याचा लाभ घेऊ शकतात. परंतु जर सदस्यत्व घेण्यापूर्वी नवीन दर लागू केले गेले तर अशा परिस्थितीत वापरकर्त्यांना नवीन दरानुसार पैसे द्यावे लागतील.

अॅमेझॉन प्राइम आपल्या ग्राहकांना एकाच वेळी खरेदी, बचत आणि मनोरंजनाशी संबंधित लाभ देत आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी प्राइम आणखी चांगले बनवण्याचा प्रयत्न करत राहू, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

अॅमेझॉनने आपल्या प्राइम मेंबरशिप सपोर्ट पेजवर या नवीन किंमती अपडेट केल्या आहेत. पाच वर्षापूर्वी भारतात अमेझॉन प्राईम लाँच करण्यात आले होते.