
मागच्या महिन्यात 12 जुलैला अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा विवाह झाला. सध्या नवविवाहित जोडपं पॅरिसमध्ये फिरतय. संपूर्ण कुटुंब पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धा आणि सुट्ट्या एन्जॉय करतय.

पॅरिसमधून मुकेश अंबानी, नीता अंबानी, मुलगी ईशा तिचा नवरा आनंद पीरामल आणि अनंत-राधिकाचे फोटो इंटरनेटवर वायरल होत आहेत. राधिका पती अनंत सोबत पॅरिसच्या रस्त्यावर फिरताना दिसतेय.

नवविवाहित नवरी राधिका मर्चेंटने घातलेला ड्रेस सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ड्रेसमध्ये चौकोर नेकलाइन, बटनाची डिजाईन, स्टायलिश बॅकलेस, फ्लेयर्ड बॉटम आणि मिनी हेमलाइन आहे.

राधिकाच्या या ड्रेसमध्ये वर्साचे ब्रांडचा ट्विल क्रॉप टॉप आणि प्लीटेड ट्विल मिनीस्कर्ट होता. हा टॉप ग्रीक पौराणिक कथेपासून प्रेरित आहे.

एका वेबसाइटवर या टॉपची किंमत 1,07, 938 रुपये दाखवण्यात आली आहे. स्कर्टची किंमत 1150 युरो म्हणजे भारतीय रुपयात 1,04,087 रुपये आहे. म्हणजे या ड्रेसची पूर्ण किंमत 2 लाख 12 हजार रुपयांच्या घरात आहे.