
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण देशभरात साजरी होत आहे. हा जयंती उत्सव 14 एप्रिलच्या पूर्व संध्येला सुरू होऊन अगदी पावसाळ्यापर्यंत सुरू राहतो. दोन महिने रोज कुठे ना कुठे जयंती निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन होत असतं.

बाबासाहेबांचं जीवन कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. केवळ राजकीय स्वातंत्र्याबरोबरच त्यांनी सामाजिक स्वातंत्र्याची लढाई लढली. जगातील ही अनोखी क्रांती होती.

बाबासाहेब हे प्रकांड पंडित होते. त्यांच्यासमोर युक्तिवाद करताना भल्या भल्यांना घाम फुटायचा. बाबासाहेबांच्या विद्वतेने जग आजही थक्क होते. म्हणूनच त्यांना 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' म्हटलं जातं.

बाबासाहेबांचं 64 विषयांवर प्रभुत्त्व होतं. त्यांना 9 भाषा येत होत्या. तर त्यांच्याकडे एकूण 32 पदव्या होत्या.

बाबासाहेबांनी तब्बल 21 वर्ष जगातील सर्वच धर्माांचा तुलनात्मक अभ्यास केला होता. प्रत्येक धर्माची चिकित्सा केली होती. त्या त्या धर्मातील उतारे त्यांना मुखोद्गत होते.

बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून केवळ 2 वर्षात 8 वर्षाचं शिक्षण पूर्ण केलं होतं.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही अत्यंत मौल्यवान पदवी घेणारे बाबासाहेब हे जगातील पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत. ही पदवी अजूनही भारतात कुणी घेतलेली नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'वेटिंग फॉर ए व्हिजा' या पुस्तकाचा कोलंबिया विद्यापीठातील अभ्यासक्रमात समावेश आहे.