
अभिनेत्री अमीषा पटेल आज भले 50 वर्षांची झाली असेल. पण अजूनही ती फॅन्सना आपल्या ग्लॅमरस अदांनी वेड लावते. अभिनेत्रीने आपल्या करिअरमध्ये अनेक आयकॉनिक गाणी केली. त्यात 2008 साली आलेल्या चित्रपटातील 'थोडा प्यार, थोडा मॅजिक' चित्रपटातील 'लेजी लम्हे' हे एक गाणं आहे.

या गाण्यात आमीषाने आपल्या ग्लॅमरचा असा तडका लावलेला की, ते पाहून प्रत्येकजण हैराण झालेला. अलीकडे अमीषा पटेलने या गाण्याबद्दल अनेक खुलासे केले. रणवीर इलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये अमीषा बोलली की, प्रोड्यूसर आदित्य चोपडाने सांगूनही तिने गाण्यात बिकिनी परिधान केली नव्हती. आदित्यला आमीषाची इमेज चेंज करायची होती.

अमीषा म्हणते मी स्वत:ला कधी हॉट किंवा सेक्सी मानलं नाही. पण आदित्य चोपडाने मला सांगितलं की, माझ्यामध्ये ती गोष्ट आहे.त्यांनी मला चॅलेंज केलेलं की, माझी सुंदर मुलीची इमेज ते हॉट आणि सेक्सी मुलीमध्ये बदलतील.

अमीषाने लेजी लम्हे गाणं शूट करण्यामागच्या अडचणी सांगितल्या. अभिनेत्रीने सांगितलं की, तिने बिकिनी परिधान न करता गाण्यासाठी खूप मेहनत केलेली. अमीषाने या गाण्यासाठी स्कूबा डायविंगची ट्रेनिंग घेतलेली. शूटिंग दरम्यान पाण्याखाली असताना व्यवस्थित शूट व्हावं म्हणून तिने ट्रेनिंग घेतलेली. थंडीच्या दिवसात हे गाणं शूट केलेलं.

अमीषा म्हणाली की, गाण्याच्या शूटिंग दरम्यान ती आणि सैफ आजारी पडलेले. जेव्हा आम्ही दोघे ते अंडरवॉटर शॉट पहायचो, त्यावेळी सैफ मला बोलायचा की, पाण्याच्या आतमध्येही तू इतकी हॉट कशी दिसू शकतेस.