
जागतिक परिस्थिती लक्षात घेता आता संपूर्ण जग तिसऱ्या युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचे बोलले जात आहे. हीच बाब लक्षात घेता आता जगातील विकसित, विकसनशील आणि अविकसित देश आपापल्या पद्धतीने स्वत:चे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

सध्या युक्रेन- रशिया आणि ईराण-इस्रायल युद्धामुळे संपूर्ण जग तणावात आहे. ईराण-इस्रायल युद्ध सध्या शमलेले असले तरी युक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्ष अद्याप चालूच आहे. हीच बाब लक्षात घेता जगातील अनेक देशांनी स्वरंक्षणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

आगामी काळातील युद्धाची चाहूल ओळखून अनेक देश बंकर, बॉम्ब शेल्टर यांची उभारणी करत आहेत. तुर्की हा देशदेखील यात मागे नाही. तुर्की या देशाने मोठा निर्णय घेतला आहे. तुर्कीतील चॅनेल एनटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार आता तेथील सरकारने भविष्यकालीन संभाव्य युद्धस्थिती लक्षात घेता एकूण 81 प्रांतांमध्ये निवारा घरे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

तुर्कीतील पर्यावरण, शहर नियोजन, जलवायू परिवर्तन मंत्रालयाने केलेल्या एका अभ्यासात तुर्कीत आपत्कालीन स्थितीत आश्रयासाठीच्या मूलभूत सुविधा नाहीत, असे समोर आले. त्यानंतर एकूण 81 प्रांतांमध्ये शेल्टर्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

भविष्यात देशावर एखादे संकट आले किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर अशा स्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे तेथील प्रशासनाने सांगितले आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)