700 वर्ष जुनी गझल, लता मंगेशकरांच्या आवाजात बनली सदाबहार; 41 वर्षांपूर्वीचं हे Sad song ओळखलं का?
1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुलामी’ चित्रपटातील ‘जिहाल-ए-मिस्कीं’ हे गाणं आजही संगीतप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे. या गाण्याच्या ओळींमागे 700 वर्षांपूर्वीच्या अमीर खुसरोंच्या रचनेची प्रेरणा आहे. गुलजारांनी या जुन्या रचनेला आपल्या शैलीत चित्रपटातील भावनेशी जोडत सुंदर गीत तयार केलं. लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजामुळे गाण्याला वेगळीच उंची मिळाली.
1 / 5

‘जिहाल-ए-मिस्कीं मकुन तगाफुल, दुराए नैना बनाए बतियां’ या ओळी अमीर खुसरोंच्या प्रसिद्ध रचनेतून घेतल्या आहेत.त्यांची ही रचना ७०० वर्ष जुन असल्याचं सांगितलं जातं.
2 / 5
खुसरोंच्या रचनेपासून प्रेरणा घेत गुलजार यांनी प्रेम आणि विरहाची भावना व्यक्त करणारं संपूर्ण गीत लिहिलं.
3 / 5
‘जिहाल’ म्हणजे अवस्था, तर ‘मिस्कीं’ म्हणजे गरीब किंवा लाचार. या ओळींचा अर्थ लाचारी पाहून नाराज होऊ नका असा होतो.
4 / 5
बहाल-ए-हिज्रा बेचारा दिल है’ या ओळीत प्रिय व्यक्तीपासून दूर राहण्याचं दुःख आणि मनाची तडफड व्यक्त होते.
5 / 5
‘गुलामी’मध्ये धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती, नसीरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांच्यासह अनेक कलाकार होते.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us