
वयाच्या 82 व्या वर्षीही अमिताभ बच्चन अत्यंत फिट आहेत. आजही ते दिवस रात्र मेहनत करतात. वयालाही मागे टाकून त्यांनी आपली मेहनत सुरू ठेवली आहे. ( Photos : Social Media)

अमिताभ बच्चन

अमिताभ यांनी त्यांची दिवसाची सुरुवात तुळशीची पाने चावून करत असल्याचं म्हटलंय. तुळशीची पानं खाल्ल्याने आपला फिटनेस चांगला राहिल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

याशिवाय अमिताभ नाश्त्यात डाळ, आवळा ज्यूस, ड्रायफूट घेतात. त्यांचं दिवसातील पहिलं डाएट अत्यंत हेल्दी आणि चविष्ट असतं.

भात, साखर आणि मिठाईपासून अमिताभ दूर राहतात. त्याशिवाय त्यांनी नॉनव्हेज खाणंही बंद केलं आहे.

डाएटच्या व्यतिरिक्त ते वर्कआऊटवरही फोकस करतात. रोज ते योगा आणि प्राणायाम करतात.

बिग बी रोज 8 तासांची झोपही घेतात.