
आजपासून दिवाळी सुरु झाली आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. घराघरात गोडधोड केलं जातंय. अशातच अमरावतीमधील गोल्डन मिठाईची चर्चा होतेय.

दरवर्षी दिवाळीनिमित्त अमरावती शहरातील रघुवीर स्वीट भंडार ग्राहकांसाठी वेगवेगळ्या मिठाई बनवतात. यंदा त्यांनी 24 कॅरेट सोन्याचा वर्ख लावलेली गोल्डन फ्लॉवर मिठाई तयार केली आहे. तसंच चांदीचा वर्ख असणारीही मिठाई आहे.

या गोल्डन फ्लॉवर मिठाईला ग्राहकांचीही पसंती मिळतेय. 11 हजार रुपये किलोने ही मिठाई विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.

काजू, बदाम, पिस्ता अशा ड्रायफूटपासून ही मिठाई बनवली आहे. त्यामुळे सणासुदीला काही चांगलं खायचं असेल, नातेवाईकांना भेट द्यायची असेल, तर ग्राहक या मिठाईला पसंती देत आहेत.

गोल्डन फ्लॉवर मिठाईला मिठाईला ग्राहकांची चांगलीच पसंती मिळतेय. राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरून देखील मागणी येत आहे. अमरावतीत या मिठाईची जोरदार चर्चा आहे.