
गेहराईयाँ हा चित्रपट येत्या 11 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील स्टारकास्ट वेगवेगळ्या पद्धतीने चित्रपटचं प्रोमोशन करताना दिसत आहे. बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेनेही इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

अनन्याने इन्स्टाग्रामवर व्हाईट कलरचा टॉप घातलाय. त्यावर रंगीबेरंगी फुलं आहेत आणि हिरव्या रंगाचा स्कर्ट तिने यावर घातला आहे. या लुकमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे.

अनन्याने या फोटोला 'मी गेहराईयाँचं टायटल साँग पुन्हा पुन्हा ऐकतेय, तेही प्रत्येक दिवशी...', असं कॅपशन दिलं आहे. तिच्याया फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.

येत्या 11 फेब्रुवारीला गेहराईयाँ हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या ट्रेलरने आणि टायटल साँगने सोशल मीडिया व्यापून टाकलाय. दीपिका पादुकोण, अनन्या पांडे यांची या सिनेमात प्रमुख भुमिका आहे.

अनन्या आपल्या इन्स्टाग्रामवर नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करत असते. याआधीही तिने आपले हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. इन्स्टाग्रामवर तिचे 21 मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत