CM Vijay : मी 15 वर्षांपासून इथे रस्त्यावर फिरतोय आणि ते.. विजय यांचं यश पाहून अभिनेता असलेल्या उपमुख्यमंत्र्यांचा जळफळाट

CM Vijay : तामिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय यांना मिळालेलं यश काही राजकारण्यांच्या डोळ्यांना खुपू लागलय. खासकरुन राजकारणात असलेल्या अभिनेत्यांना. राजकारणात असलेल्या एका अभिनेत्याने याची प्रामाणिकपणे कबुली सुद्धा दिली आहे.

| Updated on: May 26, 2026 | 12:15 PM
1 / 5
मे महिन्याच्या सुरुवातीला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यावेळी सर्वात जास्त वैशिष्ट्यपूर्ण निकाल ठरला तो तामिळनाडूचा. तिथे थलपती विजय यांच्या पक्षाच्या हाती जनतेने सत्तेच्या चाव्या सोपवल्या. पहिल्याच प्रयत्नात थलपती विजय यांच्या TVK पक्षाला 108 जागांवर विजय मिळाला.

2 / 5
राजकारणात येण्याआधी थलपती विजय यांनी चित्रपट सृष्टीत यश मिळवलं. तामिळनाडूत स्वत:चा एक मोठा चाहतावर्ग निर्माण केला. त्याचं चाहत्यांच्या माध्यमातून आधी समाजकल्याणाची अनेक काम केली. पुढे राजकीय पक्ष स्थापन केल्यानंतर विजय यांना त्याचा भरपूर फायदा झाला. आज ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत.

3 / 5
थलपती विजय यांच्याप्रमाणेच पवन कल्याण हे सुद्धा दक्षिणेकडेच्या चित्रपट सृष्टीतील एक मोठं नाव आहे.अभिनेते असलेले पवन कल्याण सध्या राजकारणात आहेत.  ते आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. या पवन कल्याण यांनी 2014 साली जन सेना पार्टीची स्थापना केली.

4 / 5
2019 च्या निवडणुकीत पवन कल्याण यांच्या पक्षाला फक्त एक जागा मिळाली. पवन कल्याण स्वत: दोन्ही जागांवर निवडणूक हरले. अनेक लोक त्यावेळी बोलू लागलेले की, पवन कल्याणचा हा पक्ष टिकेल का?. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पवन कल्याण यांच्या जन सेना पार्टीने टीडीपी-भाजप-जेएसपी या पक्षांसोबत मिळून निवडणूक लढवली. पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने 21 जागा लढवल्या. या सर्व जागांवर विजय मिळवला. आज ते आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत.

5 / 5
याच जन सेना पार्टीच्या पवन कल्याण यांनी सोमवारी एका सरकारी कार्यक्रमात प्रामाणिकपणे कबूल केलं की, तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री विजय यांना इतक्या लवकर मिळालेलं यश पाहून थोडी ईर्ष्या वाटते. तामिळनाडूच्या राजकारणाकडे पाहून दुसऱ्यांसाठी हे सोपं होतं असं वाटतं. ते कटआऊट, पोस्टर आणि होलोग्रॅमने जिंकतात. मी मागच्या 15 वर्षांपासून रस्त्यावर फिरतोय. राजकीय पक्ष चालवण्याचा अर्थ असतो लाखो लोकांना एकत्र करणं.

Follow Us