

अंजिनी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिचे अनेक फोटोज समाजामध्यमांवर चांगलेच व्हायरल झालेले आहेत. नुकताच तिने बिनिकिवरचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. तिचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

अंजिनीने नुकतंच रेड बिकीनीमध्ये एक गॅमलस फोटो शेअर केला आहे. त्याला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

सोशल मीडियावर तिचं अॅक्टिव्ह असणं आणि तिच्या फोटोजना मिळत असलेले लाईक्स पाहून ती बॉलवूडमध्ये जोरदार ड्येब्यू करण्याच्या विचारात असल्याचे कयास बांधण्यात येत आहेत.

व्हायरल होत असलेला फोटो हा मालदीव येथील आहे. अंजिनी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अंजिनी धवन ही जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूरची चांगली मैत्रीण आहे. अंजिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या दोघींचे काही फोटोसुद्धा पाहायला मिळतात.

दरम्यान, अंजिनीचा सोशल मीडियावरचा वावर आणि ती शेअर करत असलेले फोटोज पाहता आगामी कळात ती बॉलिवूडमध्ये झळकली तर त्यात काही आश्चर्य नसेल.