
अंकिता लोखंडे हिची सासू आणि विकी जैन याची आई रंजना जैन या गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. बिग बाॅस 17 च्या घरात येत रंजना जैन यांनी चांगलेच धमाके केले.

अंकिता लोखंडे हिच्याबद्दल धक्कादायक विधान देखील रंजना जैन यांनी केले. अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे बिग बाॅसच्या घरात होते खरे मात्र, सर्वाधिक चर्चा ही रंजना जैन यांचीच रंगली.

आता नुकताच रंजना जैन यांना मोठा प्रश्न विचारण्यात आलाय. काही दिवसांपासून चर्चा होती की, रंजना जैन या बिग बाॅस 18 मध्ये सहभागी होऊ शकतात. फक्त हेच नाही तर एकता कपूर हिच्या शोमध्ये...

आता यावरच रंजना जैन यांना विचारण्यात आले. रंजना जैन यांना बिग बाॅस 18 मध्ये किंवा एकता कपूरच्या शोमध्ये सहभागी होणार का हा प्रश्न विचारण्यात आला.

यावेळी रंजना जैन या म्हणाल्या की, आई घरात राहते...बाहेर थोडी जाते...घरात दोन दोन लेकरं आहेत. गेल्या काही दिवसांपासून रंजना जैन या सतत चर्चेत आहेत.