
बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अनुपम खेर यांचा काही दिवसांपूर्वीच द कश्मीर फाईल्स हा चित्रपट रिलीज झाला.

विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका देखील केला. नुकताच आता अनुपम खेर यांनी मोठा खुलासा हा केला आहे. अनुपम खेर यांनी सांगितले की, आता मला गंभीर पात्र साकारण्यास आवडतात.

कॉमेडी चित्रपट आता मला फार काही आवडत नाहीत. माझ्याकडे येणाऱ्या चित्रपटांच्या स्क्रीप्ट या गंभीर पात्राच्या असतील तर मी त्यावर विचार करतो.

म्हणजेच काय तर आता अनुपम खेर यांनी हे स्पष्ट केले की, त्यांना गंभीर पात्र चित्रपटांमध्ये साकारायचे आहेत. अनुपम खेर पुढे म्हणाले की, असे नाही की, मी कॉमेडी चित्रपट करणारच नाही.

अनुपम खेर हे कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी अनुपम खेर हे खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना दिसतात.