
इन्फ्लुएंसर अपूर्वा मखीजा 'इंडियाज गॉट लेटेंट' शो पासून चर्चेत आहे. अलीकडेच यूट्यूब स्टारने स्वत:च्या लुक्सवर कमेंट केलं. अपूर्वा मखीजाने द ट्रेटर्समधून लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्यानंतर इन्फ्लुएंसरने आता बर्थ डे आधी स्वत:वर प्रेम व्यक्त केलं.

अपूर्वाने स्वत:च्या मेकओव्हरचा एक व्हिडिओ शेअर केलाय. त्याने ती स्वत:बद्दलच उपरोधिकपणे बोलली. 'देवाने मला एटीट्यूड ऐश्वर्या रायवाला दिला आणि चेहरा असा दिला' अपूर्वाने या व्हिडिओमध्ये सांगितलय की, तिने कसा मेकओव्हर केला. या सगळ्यासाठी तिने 50-60 हजार रुपये नाही, तर तब्बल 3 लाख रुपये खर्च केले.

अपूर्वा सर्वातआधी हेअर ट्रान्सफॉर्मेशनसाठी गेली. त्यावेळी ती मस्करीच्या अंदाजात बोलली की, "मी सरांना बोललीय की, तुम्ही माझे केस ब्लीच करु शकत नाहीत. कारण माझ्या डोक्यावर चारच केस उरलेत" त्यानंतर अपूर्वा डेटिंस्टकडे विनियर लावायला गेली. व्हिडिओमध्ये तिने हे सांगितलं की, हे माझे खरे दात नाहीत. मला माझ्या खऱ्या दातांचा खूप राग यायचा. मी विनियर लावून घेतलेत"

त्यानंतर अपूर्वा स्किन ट्रीटमेंटसाठी गेली. त्यानंतर ती नेल सलूनमध्ये सुद्धा गेली. पूर्ण दिवस ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतरही ती आपल्या लूकवर खुश नव्हती.

अपूर्वाने सांगितलं, मी जवळपास 3 लाख रुपये खर्च केलेत आणि आता मी अशी दिसतेय. खरतर मी तशीच दिसते. फक्त थोडाफार फरक झालाय तो मेकअपमुळे