दोन कर्ज एकदाच घेताय? ‘या’ घोडचुका कधीच करू नका, अन्यथा EMI भरावा लागेल आयुष्यभर

आजकाल पर्सनल लोन हे सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणींवरचा एक उपाय म्हणून समोर आले आहे. घरात कोणतीही अडचण असली, की काही लोक थाटात पर्सनल लोन काढतात.

| Updated on: May 05, 2025 | 8:02 PM
1 / 7
आजकाल पर्सनल लोन हे सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणींवरचा एक उपाय म्हणून समोर आले आहे. घरात कोणतीही अडचण असली, की काही लोक थाटात पर्सनल लोन काढतात. मात्र पर्सनल लोन काढण्याची हीच सवय तुमच्या अंगलट येऊ शते. काही लोक तर एकाच वेळी दोन, तीन पर्सनल लोन काढतात. मात्र असे केल्यास तुम्हाला आयुष्यभर ईएमआयच्या जाळ्यात अडकून बसावे लागू शकते? हे कसं होऊ शकतं? ते समजून घेऊ या...

2 / 7
तुम्ही एकाच वेळी दोन पर्सनल लोन घेत असाल तर तुम्ही आर्थिक अडचणीत सापडू शकतात. कारण एक तर पर्सनल लोनचा व्याजदर अधिक असतो. त्यातही तुम्ही दोन पर्सनल लोन घेतले तर तुमचा ईएमआय वाढू शकतो. परिणामी तुमचे अर्थिक बजेट कोलमडू शकते.

3 / 7
दुसरी गोष्ट म्हणजे दोन-दोन पर्सनल लोन घेतल्यास तुमचे व्याजात अधिक पैसे जाऊ शकतात. पर्सनल लोन हे अनसेक्युअर्ड लोन असते, त्यामुळेच अशा प्रकारच्या लोनचे व्याज जास्त असते. असे असूनही तुम्ही दोन-दोन पर्सनल लोन काढले तर तुमचे व्याजातच पैसे जाऊ शकतात. यामुळे तुमच्या मासिक उत्पन्नावर तसेच मासिक खर्चावरही परिणाम होऊ शकतो.

4 / 7
तुम्हाला आजकाल एकापेक्षा अधिक पर्सनल लोन मिळतात. यामुळे तुम्हाला हवे तेव्हा पैसे वापरायला मिळतात. मात्र हीच सुविधा तुमच्यासाठी अडचणीची ठरू शकते. एकापेक्षा जास्त लोन घेतल्यामुळे तुमच्यावर ओव्हर बॉरोईंगचा (एकापेक्षा जास्त कर्ज घेणे) धोका वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही महिन्याअखेर जी कमाई करता, ती सर्वकाही कर्जाचे हफ्ते फेडण्यातच जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला महिन्याकाठी बचत करणे जवळजवळ अशक्य होऊ शकते.

5 / 7
एकापेक्षा जास्त पर्सनल लोन काढले तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही त्याचा परिणाम पडू शकतो. परिणामी भविष्यात तुम्हाला घरासाठी किंवा अन्य काही गोष्टींसाठी कर्ज काढायचे असेल तर अडचणी येऊ शकतात.

6 / 7
कोणतेही कर्ज घेण्याआधी अगोदर डेब्ट टू इन्कम (DTI) हा रेश्यो तपासला पाहिजे. हा रेश्यो जर 40 टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही काळजी घेणे गरजेचे आहे. कारण तुम्हाला कर्जाचे हफ्ते फेडणे मुश्किल होऊ शकते.

7 / 7
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)