
आपण सुंदर दिसावं म्हणून बहुसंख्य महिला नखांना पॉलिश लावतात. विशेष म्हणजे नखे सुंदर दिसावीत यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने नेल पॉलिश केलं जातं. मात्र नेल पॉलिशची हीच सवय तुमच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकते.

नेल पॉलिशध्ये टॉल्यूइन (Toluene) नावाचे एक रसायन असते. ते नखाच्या माध्यमातून शरीरातील पेशींपर्यंत पोहोचते. त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

नखांना नेहमी नेल पॉलिस लावल्याने ते खराब होऊ शकतात. प्रमाणापेक्षा जास्त नेलपॉलिस लावणे हे नखांसाठी धोकादायक ठरू शकतं. सतत नेल पॉलिस लावल्याने नखे कमजोर होतात. त्यांची नैसर्गिक चमक कमी होते. अनेकवेळा नेल पॉलिशमुळे इन्फेक्शन होतं.

नेल पॉलिश तयार करण्यासाठी स्पिरीटचा वापर केला जातो. स्पिरिट हे आतड्यांसाठी हानीकारक असते. नेल पॉलिशमधील हे रसायन शरीरात गेल्यावर श्वसनासंबंधीच्याही काही अडचणी निर्माण होऊ शकतात.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही यातील कोणत्याही माहितीचा दावा करत नाही किंवा समर्थनही देत नाही. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)